जगदंब युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सेनगाव तालुक्यातर्फे तहसीलदारांना निवेदन

    71
    Advertisements

    ✒️शेख आवेज(विशेष प्रतिनिधी,सेनगाव)मो:-830886258

    सेनगाव(दि.23सप्टेंबर):-मागील काही दिवसापासून सेनगाव तालुक्यामध्ये खूप अतिवृष्टी झाली.या अतीवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीन,कापूस,तूर यासह सर्वच पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अजूनही मुसळधार पाऊस चालू असल्यामुळे सोयाबीन पिकाच्या उभ्या झाडांच्या शेंगांना कोंब फुटत आहेत.

    व काही भागात सोयाबीन काढणीला आली असून ती पिके काळी पडली आहेत. त्या पिकांचे लवकरात लवकर सर्वे करावेत अशी मागणी जगदंबा युवा ग्रुप महाराष्ट्र राज्य सेनगाव तालुकाध्यक्ष जनार्धन पुरी व तालुका उपाध्यक्ष गजानन गव्हाणे यांनी निवेदनाद्वारे तहसीलदारांना केली आहे.