हिंगणघाट येथे 25 सप्टेंबर पासून सुरु होणारी संचारबंदी होणार का ?

    51
    Advertisements

    ?संचारबंदी सापडली संशयाच्या भोवऱ्यात?

    ✒️इकबाल पैलवान(हिंगणघाट प्रतिनिधी)मो:-9923451841

    हिंगणघाट(दि.23सप्टेंबर):-शहरातील व्यापारी संघटना,सामाजिक कार्यकर्ते तसेच सामाजिक संघटनांच्या स्वयंप्रेरणेने घोषित जनसंचारबंदिला होत असलेला विरोध शमविन्यासाठी आ ज २३ रोजी स्थानिक उपविभागीय कार्यालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले.
    परंतु एकंदर परिस्थिति पहाता येत्या २५ पासून सुरु होत असलेली जनसंचारबंदि बारगळणाऱ असल्याची चीन्हे दिसू लागली आहेत.

    आज सकाळी ११ वाजता आमदार समिर कुणावार यांचे अध्यक्षतेखाली सभा आयोजित करण्यात आली होती,यात काही वेळाकरीता शिवसेनेचे माजी आमदार अशोक शिंदे हे उपस्थित झाले होते,परंतु ते निघुन जनसंचारबन्दीला पाठिम्बा न देता निघुन गेल्याने संचारबन्दी बारगळणाऱ असे दिसुन येत आहे.छोट्या व्यापाऱ्यांचा,शेतकऱ्यांचा,कामकरी तसेच श्रमजीवी या संचारबन्दीचे विरोधात असून त्यांची मात्र कुणी दखलच घेत नसल्याने प्रशासन आणि बंदचे आवाहन करणारे तथाकथित समाजसेवी यांची भूमिका मात्र स्पष्ट नाही.