?सभापती सतिश बप्पा पवार यांची मागणी
✒️गोपाल भैय्या चौहान(बीड प्रतिनिधी)मो:-9665667764
गेवराई(दि.30सप्टेंबर):- तालुक्यात झालेल्या आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे प्रचंङ नुकसान झाले असुन उस उङीद कापुस बाजरी पिकाचे तात्काळ पंचनामे करावे असे कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या मार्गदर्शनाखाली मा प स सभापती तथा मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार यानी गेवराई तहसिल कार्यालयाकङे मागणी केली आहे.
सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील रामपुरी , तलवाङा भेङटाकळी, भेङ, पाचेगाव ,जातेगाव गढी, ढालेगाव गोपतपिंपळगाव, धोङराई सह ग्रामीण शहरी भागात मोठ्या प्रमाणावर वादळीवार्यासह आवकाळी नैसर्गिकरीत्या वादळ वार्याच्या आणी पावसामुळे प्रचंङ नुकसान झाले असुन उस उङीद कापुस बाजरी कोसला तुथी सह पिकाचे नुकसान झाले आहे.
मा कार्यसम्राट आमदार ॲङ लक्ष्मण अण्णा पवार यांच्या नेञत्वाखाली मा सभापती तथा मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार यानी तालुक्यातील झालेल्या पिकाचे तात्काळ पंचनामे करावेत अशी मागणी तहसिल कार्यालयाकङे केली आहे तात्काळ पंचनामे न झाल्यास तिव्र आंदोलन करण्यात येईल असा ईशारा मा सभापती तथा मा जि प सदस्य सतिष बप्पा पवार या सह शेतकरी बांधवानी व पदाधिकार्यानी दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.