?विद्यार्थ्यांकरिता सुवर्ण संधी
✒️यवतमाळ(पुरोगामी संदेश नेटवर्क)
यवतमाळ(दि.3ऑक्टोबर):-अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने महाराष्ट्राच्या तळागाळातील विद्यार्थ्यांकरिता दिनांक 15/10/2020 ला भारतरत्न डाँ ए पी, जे अब्दूल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिन निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहे.
या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थी साठी परिक्षा आयोजित करण्यात येत असून सर्व सहभागी विद्यार्थ्यांना डिजिटल सहभागी प्रमाणपत्र दिले जाणार आहे.तरी पालकांची इ मेल आयडी तयार नसल्यास तयार करण्याची सुचना आपल्या स्तरावरून देण्यात यावी. शाळा जरी बंद असल्या तरी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात टिकवून ठेवणे व डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांचे स्वप्न पुर्तीकरिता वाचन विकास घडवून आणणे काळाची गरज आहे.
परीक्षा खालीलप्रमाणे तीन गटात होणार असून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना सहभागी करण्याचं आव्हान करण्यात येत आहे.
गट क्रमांक 1-इयत्ता 1ली ते 5वी
गट क्रमांक 2-इयता 6वी ते 8 वी
गट क्रमांक 3-इयता 9वी व 10 वी
परीक्षेकरिता लिंक आपल्याला अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य सर्व ग्रुपमध्ये दि. 10/10/2020ला पुरविण्यात येईल. सर्व शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी व मोठय़ा प्रमाणात सहभागी व्हावे.
या स्पर्धेत शासकीय, निमशासकीय, अनुदानित, विनाअनुदानित सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना सहभागी होता येईल.अशी माहिती आयोजक गजानन गोपेवाड ₹राज्य समन्वयक महाराष्ट्र राज्य),जयश्री सिरसाटे (महिला राज्य समन्वयक महाराष्ट्र) यांनी दिली, या उपक्रमा बाबत सविस्तर माहिती करीता 7378670283 या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन अग्निपंख फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य परिवार यांनी केले.