आक्षेपार्ह पोस्ट करून टवाळक्या करणे फेसबुक्यांना पडले महागात

    46
    Advertisements

    ?आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी निलेश राणे सह दोघा विरोधात केज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

    ✒️नवनाथ पौळ(केज,तालुका प्रतिनिधी)मो:-8080942185

    केज(दि.12ऑक्टोबर):-आक्षेपार्ह पोस्ट केल्या प्रकरणी निलेश राणे सह दोघा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सदरील प्रकरण असे आहे की, अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी दोन्ही राजे यांच्या वर जी टिका केली होती. त्याचा निषेध काही नेत्यांनी केला.

    परंतु सोशल मिडीयावर निलेश राणे (रा.कणकवली ) विवेक अंबाडा (रा. लाडेगाव ता.केज) रोहण चव्हाण (रा. पळसखेडा ता. केज) यांनी द्वेषभाव निर्माण होईल अशी पोस्ट केली आहे.वंचित बहुजन आघाडी केज तालुका अध्यक्ष बाळासाहेब विठ्ठल मस्के यांनी दि.९ आॅक्टो रोजी आपल्या भ्रमणध्वनी व्हाॅट अप पाहत असतांना संदेश दिसुन आला.

    या प्रकरणी केज पोलिस ठाण्यात निलेश राणे सह विवेक अंबाडा व रोहण चव्हाण यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिध्दे करत आहेत.