▪️सामाजिक – शैक्षणिक क्रांतीचे प्रणेते – महात्मा ज्योतिराव फुले : शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील
▪️संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार : प्रा भरत शिरसाठ ( प्रदेशाध्यक्ष – महाराष्ट्र समता शिक्षक परिषद )
▪️प्रमुख अतिथींना “भारतीय संविधान ” शाल गुलाबपुष्प देऊन स्वागत !…
✒️एरंडोलधरणगांव प्रतिनिधी(पी डी पाटील)
एरंडोल / धरणगांव(दि.16एप्रिल):- तालुक्यातील तळई गावात छत्रपती शिवराय स्मृतीदिवस, क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व प्रज्ञासूर्य डॉ.बाबासाहेब आंबेडकर या गुरू – शिष्य जयंतीनिमित्त वैचारिक प्रबोधनपर व्याख्यान संपन्न झाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रकाश तामस्वरे सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभाकर यशवंत पाटील होते व्याख्याते म्हणून महाराष्ट्र समता शिक्षक परिषदेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.भरत शिरसाठ, शिवव्याख्याते लक्ष्मणराव पाटील प्रमुख अतिथी म्हणून जळगांव शिवसेनेचे जिल्हाप्रमुख वासुदेव पाटील, माजी जि प उपाध्यक्ष ज्ञानेश्वर आमले, ओबीसी मोर्चाचे राज्यसचिव आबासाहेब राजेंद्र वाघ, सत्यशोधक समाज संघाचे जिल्हाध्यक्ष पी डी पाटील व प्रमुख उपस्थिती सरपंच भाईदास मोरे, दशरथ पाटील, अरुण पाटील, यशवंत पाटील, बबनराव पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवराय, महाराणा प्रताप, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. विचार मंचावर उपस्थित मान्यवरांना भारतीय संविधान शाल व गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
महापुरुषांचा जयंतीउत्सव नाचून नव्हे तर वाचून साजरा करावा या उद्देशाने तळई गावात या महापुरुषांच्या संयुक्तिक जन्मोत्सव निमित्ताने व्याख्यानाचे आयोजन केले. व्याख्याते लक्ष्मणराव पाटील यांनी महात्मा फुले व बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील संघर्ष, शैक्षणिक व सामाजिक कार्य तसेच समतेच्या विचारांनी प्रेरित होऊन देशातील प्रत्येक व्यक्तीला समान हक्क व अधिकार प्राप्त करून देण्यासाठी भारतीय संविधानाचे योगदान याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर प्रा.शिरसाठ यांनी भारतीय संविधानाची विस्तृत माहिती देत भारतीय संविधानाचे आपल्यावर अनंत उपकार आहेत असे प्रतिपादन शिरसाठ यांनी केले.
आयोजकांच्या वतीने जन्मोत्सवाचे औचित्य साधून गावातील आजी-माजी शिक्षक, डॉक्टर, वकील, आजी-माजी सैनिक, ड्राईव्हर, आशावर्कर, परिचारिका, आदर्श शेतकरी अशा गावातील सर्व रत्नांचा शाल व गुलाब पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. जयंती महोत्सवाच्या औचित्य साधत शाळेतील मुलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय विद्यार्थ्यांना गोल्ड, सिल्वर, ब्रॉन्झ मेडल व शैक्षणिक साहित्याचे मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
या अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश तामस्वरे सर व आभार यशवंत पाटील यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकाश तामस्वरे, सुनील तामस्वरे, नितीन तामस्वरे, युवराज तामस्वरे, चंद्रकांत तामस्वरे, किसन तामस्वरे, सूर्यकांत तामस्वरे, संजय मैराळे, भारत मोरे, अशोक मैराळे, बबलू तामस्वरे व राजमुद्रा ग्रुप, भीमक्रांती मित्र मंडळ, माळी साम्राज्य ग्रुप, एम एस आर टी सी ग्रुप, बजरंग ग्रुप, राजे ग्रुप, संत सावता महाराज ग्रुप, समस्त धनगर समाज ग्रुप, विर एकलव्य ग्रुप तसेच सरपंच, उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सर्व तळई गावातील ग्रामस्थ यांनी सहकार्य केले.