मराठी विषय शिक्षकांचे विदर्भ स्तरीय कवी संमेलन संपन्न

310

✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

भंडारा(दि.28एप्रिल):- मराठी विषय शिक्षक असोसिएशन भंडाऱ्याच्या वतीने विदर्भस्तरीय ऑनलाईन कवीसंमेलन आयोजित करण्यात आले. या कवी संमेलनात विदर्भातील अनेक कवींनी आपल्या कविता सादर केल्या. जो न देखे रवी, वो देखे कवी या उक्तीप्रमाणे कवींच्या कल्पना खूप महान असतात. याचीच प्रचिती आज मराठी विषय शिक्षक भंडारा द्वारा आयोजित एकदिवसीय ऑनलाईन कवी संमेलनामध्ये बघायला मिळाली. विदर्भस्तरीय कवी संमेलनाचे अध्यक्षस्थान, सेवानिवृत्त प्राचार्य अमृत मोहतुरे यांनी भूषविले होते. तर उद्घाटन मराठी महासंघाचे राज्य सचिव प्रा. बाळासाहेब माने यांनी केले.

अशाप्रकारे कवींना व्यासपीठ उपलब्ध करून देणे हे स्तुत्य उपक्रम असल्याचे मत उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले. प्रा. संजय कावरे यांनी, शेती मातीच्या कवितांनी आम्ही शेतकरी पुत्र असल्याचा अभिमान अधिक बळावला. ही कविता सादर केली. मा. नितीन वरणकार यांनी मी तिला पाहून म्हटले : उ , ती म्हटली हुं , बाप म्हटला : यू हू…! या कवितेसोबत..!

बुढ्याने माझ्या लग्नाची बेजार केली घाई…. ही कविता सादर केली.

मा. गोपाल मापारी यांनी पुण्याने शिवले नामक केवड्याचे फुल केसात, मळतो तु जे फुल केवड्याचे, मज एक एक पडते ते फुल केव्हढ्याचे… ही कविता सादर केली.! प्रा. संजय कावरे यांनी, जातं ही कविता

जातं एक संस्कृती होती त्याबद्दलच्या भावना नाही तर गाऱ्हाणे मांडले !

प्रा. ओमप्रकाश ढोरे यांनी, घर मनात वसले असता चोर आणि कवी वर्हाडी कविता कवींच्या वाटेल नका जाऊ , आपण आपली खाजवून नका घेऊ ही कविता सादर केली प्रा. कावेरी खुरणे बीड, यांनी भार नाही मी तलवार आहे. ही कविता उत्तमरीत्या सादर केली. याव्यतिरिक्त मराठी महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा. संपतराव गर्जे, उपाध्यक्ष डॉ. ज्ञानेश हटवार, श्री. संतोष भाकरे, प्रा. शंकर अंकुश यांनी सुद्धा स्वरचित कविता सादर केल्या.

कवी संमेलनाचे प्रमुख अतिथी म्हणून डॉ. अंजना खताळ, प्राचार्य डॉ. सुधीर मोते, सेवानिवृत्त प्राचार्य धर्मराज काळे, डॉ. विजय हेलवटे, डॉ. पांडुरंग कंद, प्रा. दिलीप जाधव, प्रा. संजय पाटील, प्रा. रेखा कटके, प्रा. योगेंद्र सनेर, प्रा. सुधाकर ठाकूर, प्रा. व्यंकट दुडीले, प्रा. बाबासाहेब पाटील, प्रा. चांगदेव खोले, प्रा. नामदेव मोरे, प्रा. मंजिरी गजरे, प्रा. विजयकुमार सावंत, प्रा. यशवंत पवार, डॉ. जुगल धोटे, प्रा. पवन कटरे, प्रा. जागेश्वर भेंडारकर प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. अरविंद राठोड, श्री. घनश्याम पटले, प्रा. निलेश आमले उपस्थित होते,

कवी संमेलनाचे संचालन कविवर्य गोपाल मापारी, प्रा. संजय लेनगुरे यांनी केले, प्रस्ताविक प्रा. जितेंद्र टिचकूले, यांनी केले तर, आभार प्रा. प्रियंका बोपचे, प्रा. प्रांजली दरवळकर यांनी मानले, कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. अंकुश तितीरमारे, प्रा.केशव कापगते, प्रा. दिलीप करंबे, प्रा. छगन झंजाळ, प्रा. अनिल रामटेके, प्रा. प्रवीण वंजारी, प्रा. निशिकांत ईश्वरकर, प्रा. वैशाली मेश्राम, प्रा. शुभांगी सरादे, प्रा. रेखा तितीरमारे, प्रा. प्रकाश कोळी, प्रा. सुरज सेलोकर, प्रा. ग्यानीराम धनगर, प्रा. उत्तम बनवाडे, प्रा. आशिष सिंगनजुडे, प्रा. दुर्गेश वंजारी, प्रा. प्रीती कांबळे प्रा. मनोहर कन्नाके, प्रा. कोमल मानकर, प्रा. वर्षा सुखदेवे प्रा. शुभम सांगोळे, प्रा. अस्मिता बोरकर यांचेसह बहुतांश मराठी विषय शिक्षकांनी परिश्रम घेतले.