ब्रम्हपुरी तालुका विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाची ग्रामीण व शहर कार्यकारिणी गठीत

303

✒️रोशन मदनकर(उप संपादक)

ब्रम्हपुरी(दि.30एप्रिल):-विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सहकार्यवाह तथा नागपूर विभागाचे शिक्षक आमदार मा. सुधाकरराव अड्बाले यांचे मार्गदर्शनाखाली व जिल्हा कार्यकारिणी यांच्या सभेत ठरल्यानुसार लोकशाही पद्धतीने ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण व शहर कार्यकारिणी गठीत करण्यात आली.

त्याअनुषंगाने ब्रम्हपुरी (शहरी व ग्रामीण) तालुक्याचे निवडणूक निरीक्षक म्हणून सुनील शेरकी, अध्यक्ष विमाशी संघ जिल्हा चंद्रपूर (ग्रामीण), यांचे मार्गदर्शनात व जिल्हा कार्यकारिणीतील पदाधिकारी, तालुक्यातील शिक्षक तथा शिक्षिका यांचे उपस्थितीत, नेवजाबाई हितकारिणी कन्या विद्यालय येथे सोमवार, दिनांक 28/04/2025 ला दुपारी 4.00 वाजता सभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर सभेत कार्यकारिणीचे गठन करण्यात आले

ब्रम्हपुरी तालुका ग्रामीण कार्यकारिणी अध्यक्ष कमलेश उंदिरवाडे उपाध्यक्ष दिलीप साखरे, सुधीर राउत, चंद्रपाल माकडे, तारिका धोटे कार्यवाह श्रीहरी ठेंगरे

सहकार्यवाह अमित येलके, गोविंदा चव्हाण, दादाजी घ्यार, सुप्रिया सहारे

कोषाध्यक्ष हेमंत भावे, संघटक संजीव गजपुरे, कल्पना कोल्हे,

सहसंघटक शंकर बावणे, रवींद्र तुपटे

प्रसिद्धी प्रमुख हितेश कुर्वे, ओविदास उईके, आश्रमशाळा प्रमुख नरेश चौधरी, नवनीत राउत(क.महा.विद्या प्रमुख) ब्रम्हपुरी तालुका शहरी कार्यकारिणी, अध्यक्ष अविनाश म्हस्के सर, उपाध्यक्ष जितेंद्र बेले, श्री. राजू काळूसे , माया कापगते , सुरेखा कावळे कार्यवाह अतुल कानझोडे सर

सहकार्यवाह , सचिन खोब्रागडे , निलेश दोनाडकर, हेमकांता बावनकुळे, कोषाध्यक्ष मनोज चौके संघटक विलास रामटेके, संदीप मेश्राम, सहसंघटक दुरभाष्य खोब्रागडे, (क.महा. विद्या प्रमुख) पंकज बेन्देवार, सल्लागार राजेंद्र हटवार (निवृत्त शिक्षक) उपरोक्त सभेस निवडणूक निरीक्षक शेरकी , किंदर्ले, राउत, सतीश मेश्राम, रुपेश पुरी यांनी उपस्थिती दर्शवून मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन हटवार यांनी केले तर म्हस्के यांनी मान्यवरांचे आभार मानले.