बिरसा मुंडा योजनेत विहिरीवर लावलेले सौर ऊर्जा पॅनल वादळात नेस्तनाबूत..

45

✒️प्रतिनिधी नागभीड(संजय बागडे)

नागभीड(दि.5मे):-तालुक्यातील कोसंबी गवळी येथील शेतकरी जाणबा धोंडू श्रीरामे यांना पंचायत समिती नागभीड येथून शासनाच्या बिरसा मुंडा योजने अंतर्गत सिंचन विहीर मिळाली. शेतकऱ्यांनी जीवाचा आटापिटा

करून नावेगावं हुंडेश्वरी येथील शेतात विहीर बांधली. त्यावर सौर पॅनल लावून मोटार सुद्धा बसाविली. काल झालेल्या वादळात पॅनल दुसऱ्या बांधित उडून जाऊन चकणाचूर झाली..सोलरच्या चार प्लेटा तुटल्या व स्टॅक्चर उडालेला आहे. वाढळी वारा, गारपिटीने बऱ्याच

शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे.. शासनाने सोर पॅनल दुरुस्त न. करता नवीन पॅनल लावून द्यावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे..