अतिवृषटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यास हेक्टरी पन्नास हजार मदत देण्याची मागणी

    39

    ?मराठा सेवा संघाच्या वतीने दिले निवेदन

    ✒️अनिल साळवे(गंगाखेड प्रतिनिधी)मो:-8698566515

    गंगाखेड(दि.27ऑक्टोबर):-येथे तहसील कार्यालय गंगाखेड यांना मराठा सेवा संघ तालुका गंगाखेड व जील्हाकर्यकरणी परभणी यांच्या वतीने निवेदन देण्यात आले या निवेदनात गंगाखेड मराठा सेवा संघाच्या वतीने अतिवृष्टी मुळे शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे हेक्टरी पन्नास हजार रुपये मदत तात्काळ द्यावी तसेच मराठा समाजातील विद्यार्थत्यांना तालुका पातळीवर वसतिगृहची सुविधा उपलब्ध करून देण्यात यावी आणि इतर मागणीचे निवेदन आले.

    यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुनिल जाधव, जिल्हा प्रवक्ते सुभाष ढगे, कोषाध्यक्ष सुभाष जाधव तालुकाध्यक्ष प्रा. डॉ. संजिव कोळपे, सचिव राजकुमार जाधव, शहराध्यक्ष संजय बेंद्रे, जिल्हा सदस्य मोतीराम चवरे, बारगीरे साहेब, गजानन काकडे, अंगद पोळ, संतोष गव्हाणे, संभाजी ब्रिगेडचे तालुका अध्यक्ष शंकर पवार, कृष्णा भिसे, गोविंद घोगरे, जाधव साहेब, सोपान बाबर कैलास पवार, पवन वरकड, वैजनाथ जाधव, सुकेश सूर्यवंशी, कृष्णा सूर्यवंशी, वैभव भोसले, व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.