कु.कांचन पाटील दहावीच्या परीक्षेत मुलींमधून प्रथम

85

अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अडगाव (खाडे ) येथील वसंतराव नाईक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.कांचन खुशालराव पाटील ही 78.40 टक्के घेऊन विद्यालयात मुलींमधून प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे.

नुकत्याच लागलेल्या एस.एस सी. परिक्षेत कांचनने घवघवीत यश मिळवले आहे. कु.कांचनच्या घरची आर्थिक परिस्थिती ही अंत्यत हालाखीची असून तिचे आईवडील हे शेतीवर मजुरी करतात. अत्यंत बिकट परिस्थितीतुन मार्ग काढत कांचनने हे घवघवीत यश प्राप्त केले आहे. 

कांचन ही ग्रामीण भागातील गरिब व होतकरू विद्यार्थ्यासाठी प्रेरणा स्त्रोत बनली आहे. तिच्या या यशाबद्दल बद्दल गावकऱ्यां तर्फे कांचनवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. कांचनच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक श्री. अग्रवाल सर, तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी तीचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे.

कांचन तीच्या यशाचे श्रेय तिचे आई-वडील तसेच तिच्या सर्व शिक्षकांना देते.