राज्यपाल नियुक्त जागेसाठी राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे अँड. श्रीहरी बागल याचे नाव अग्रेसर

    41

    ✒️मुंबई(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    मुंबई(दि.1नोव्हेंबर):-कोरोनामुळे पुढे ढकलल्या बारा राज्यपाल नियुक्त जागेचा ठराव नुकताच मंत्रीमंडळ बैठकीत मजुर करण्यात आला. महाविकास आघाडीचा घटक पक्ष म्हणुन राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड .श्रीहरी बागल याचे नाव अग्रेसर असल्याची माहिती अंतर्गत सूत्राकडून मिळाली आहे.महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राज्यपाल व सरकार याचे सबध सारखेच ताणले गेले आहेत.

    राज्यपाल प्रत्येक गोष्टीला कायद्याची चैकट लावत आहेत. यामध्ये शपथविधी वेळी घडलेल्या दोनदा शपथ घेण्याचा प्रकार असो किंवा विघिपीठ परीक्षा घेण्याविषयीचे मत असो राज्यपालांनी प्रत्येक वेळेस एक भूमिका घेतली आहे.काहि दिवसापूर्वीच मुखमत्री साहेब यानी लिहलेले पत्र व त्यावर मुख्यमंत्र्यांचे उतर यावरून मोठा वादग झाला आहे .या पाश्र्वभूमीवर जर राज्यपाल नियुक्त जागेविषयी ठरलेले निकष न पाळता उमेदवार दिले तर परत एकदा राज्यपाल विरूद्ध सरकार असा संघर्ष पेटु शकतो.

    यावर उपाय म्हणून महाविकास आघाडीच्या नेत्यांनी योग्य निकष असलेले उमेदवार निवडलेले आहेत असे खासगीत सागीतले जाते.अॅड. श्रीहरी बागल. राष्ट्रीय अध्यक्ष- राष्ट्रीय स्वराज्य सेना यानी लोकसभा व विधानसभा निवडणुकीत बिनशर्त आघाडी ला पाटीबा दीला होता. स्वताचा पक्ष दिल्ली येथे नोंदणीकृत असताना स्वताच्या पक्षाचे उमेदवार उभे नकरता मा. श्री.लोकनेते शरदचंद्र पवार साहेब याच्या मार्गदर्शनात आघाडीचे उमेदवार भरघोस मताने कसे जिकुन येतील या साठी संपुर्ण महाराष्ट्रत चांगल्या प्रकारे काम केले होते.राष्ट्रीय स्वराज्य सेनेचे संरपच, पदाधिकारी व कार्यकर्त्यनी आघाडीचे काम योग्य पध्दतीने केले होते.

    मा.श्री .जयंत पाटील साहेब व मा श्री.बाळासाहेब थोरात साहेब यानी त्याच्या वर टाकलेल्या विश्वाला ते नेहमीच पात्र ठरले आहेत. स्वता कायदेतज्ञ असल्याने त्याचे महिला व बालकल्याण विषयात मैलाचे काम आहे.म्हणुनच त्याच्या नावाला राज्यपाल साहेब विरोध करू शकत नाहि. याचा मागोवा घेऊनच त्याचे नाव ऐनवेळी पुढे आलेले दिसत आहे.