फळे,भाज्या जास्तकाळ टिकण्यासाठी युवकाने शुन्य खर्चात बनविले शितकक्ष

    52

    ✒️अशोक हाके(बिलोली,विशेष प्रतिनिधी)मो:-9970631332

    कुंडलवाडी(दि.1नोव्हेंबर):-येथील युवक व बीड येथील आदित्य कृषी महाविद्यालयाचा विद्यार्थी आशुतोष प्रदिप अंबेकर याने शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करताना फळे,भाज्या टिकण्यासाठी कुंडलवाडी येथे शुन्य खर्चात शितकक्ष बनविले आहे.दि.३१ आँक्टोबर रोजी येथील प्रदिप अंबेकर यांच्या शेतात या बिनखर्चिक शितकक्षाचा प्रयोग करण्यात आला.

    कृषी कार्यानुभव कार्यक्रमातंर्गत कृषिदूत आशितोष प्रदिप अंबेकर याने प्रत्यक्ष कृतीतून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्राची माहिती दिली आणि शुन्य खर्चात शितकक्ष कसा बनविला जाऊ शकतो.याचे प्रात्यक्षिक करून दाखविले.विटांच्या सहाय्याने कुंड तयार करून त्यात दोन कप्पे करायचे आणी त्यात फळे,भाजीपाला ठेवावा.त्यानंतर पाण्यात भिजवलेले सुती पोते वरून झाकावित.

    त्यामुळे हा माल ५ ते ६ दिवस खराब होत नाही.असे हे बिनखर्चाचे शितकक्ष असल्याचे आशुतोष अंबेकर याने सांगितले.या कक्षाचा शेतकऱ्यांनी वापर करावा. जेणेकरून आपली फळे व भाजीपाला खराब होणार नाही.बाजारात भाव आल्यावर ती विकता येतील असे आशितोष याने सांगितले. आशितोष हा माजी आमदार कै.जयरामजी अंबेकर यांचा नातु व काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रदिप अंबेकर यांचा मुलगा आहे. यावेळी पत्रकार अशोक हाके,कुणाल पवारे आदी उपस्थित होते.