▪️मुख्याध्यापकांच्या हस्ते नंदिनी व चेतनाचा पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन !…
✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील)
धरणगाव(दि.21मे):– शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल धरणगाव शाळेच्या विद्यार्थ्यांनी एस एस सी बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. दि. १३ मे ला दहावीचा ऑनलाईन निकाल घोषित झाला. शाळेचा निकाल ९७ % लागला असुन सावित्रीमाईंच्या लेकींनी उंच भरारी घेतली आहे.शाळेतून प्रथम नंदिनी तुळशीराम भोई – ९० %, द्वितीय चेतना संजय जावरे – ८७.६० %,
तृतीय तेजस्विनी हरी माळी – ८७.२० %, यांचा शाळेचे मुख्याध्यापक जे.एस.पवार, वर्गशिक्षक पी डी पाटील यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी शाळेचे ज्येष्ठ लिपिक जे एस महाजन, पी डी बडगुजर, जीवन भोई तसेच सर्व शिक्षक बंधू – भगिनी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.