चोरटी गावात दिवाळी पारंपरिक पद्धतीने साजरी

    49

    ?लोप पावत चाललेली गायगोधन पध्दत उत्साहात साजरी

    ✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986

    ब्रम्हपुरी(दि.15नोव्हेंबर):- तालुक्यात दिवालीच्या पर्वावर लोप पावत असलेली गायगोधन परंपरा आजही शेकडो वर्षांपासून चोरटी गावामध्ये नित्यनेमाने दरवर्षी साजरी केली जाते.आधुनिक युगात दिवाळीला नवे स्वरूप प्राप्त झाले असले तरी चोरटी गाव मात्र सर्व परंपरेला छेदून आपली कला आणि संस्कृती जोपासत एकात्मतेचा परिचय देत आपल्या गावामध्ये गायगोधन साजरा करण्यात आला.

    गावातील शेतकरी आपल्या गायी गावच्या मुख्य रस्त्यावर आणून त्यांची मिरवणूक काढली जाते.ही मिरवणूक पाहण्यासाठी दिमाखाने संपूर्ण गावातील स्त्री, पुरुष,लहान बालके कुतुहुलाने मोठया संख्येने गर्दी करतात.प्रत्येकांनी आपली संस्कृती, भाषा,कला आणि वैभव जोपासले पाहिजे हाच मनी संदेश घेऊन चोरटी गावातील लोकांनी आदर्श निर्माण केला आहे.