✒️अशोक हाके(बिलोली,तालुका प्रतिनिधी)मो:-9970631332
कुंडलवाडी(दि.30नोव्हेंबर):-नगरपरिषदेच्या महाविकास आघाडीच्या सत्ताधारी नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार व त्यांच्या नगरसेवकांकडून शहरातील मुख्य बाजारपेठ व विविध प्रभागातील स्वच्छतेची पाहणी करून घनकचरा कंत्राटदारास स्वच्छतेबाबत सुचना केले आहेत.कुंडलवाडी नगरपरिषदेतर्फे देण्यात आलेल्या घनकचरा कंत्राटदाराच्या कामगारांनी दि.२७ नोव्हेंबर रोजी पीएफ रक्कमेसाठी कामबंद केले होते.
यावर महाविकास आघाडीच्या नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार व नगरसेवकांनी यावर तोडगा काढला व २८ नोव्हेंबर पासुन पुन्हा सर्व कामगार शहर स्वच्छतेच्या कामावर परतले.तसेच शहरातील मुख्य बाजारपेठ व विविध प्रभागातील स्वच्छतेबाबतची पाहणी करून गुत्तेदाराला शहरातील स्वच्छतेबाबत काटेकोरपणे पालन करून शहर स्वच्छ कसे राहील याबाबत सक्त सुचना दिल्या.
तसेच शहरातील नागरिकांनी ही शहर स्वच्छ ठेवण्यासाठी नगरपरिषदेला सहकार्य करण्याचे आवाहन नगराध्यक्षा सुरेखा जिठ्ठावार यांनी केले आहे.शहर स्वच्छतेची पाहणी नगराध्यक्षा प्रतिनिधी नरेंद्र जिठ्ठावार, नगरसेवक मुख्तार शेख,सचिन कोटलावार,रमेश करपे ,नगरपरिषद कर्मचारी धोंडीबा वाघमारे आदीजण यावेळी उपस्थित होते.