

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*
राजुरा – चंद्रपूर जिल्हा क्रीडा, कला, कार्यानुभव निदेशक संघटनेच्या जिल्हाध्यक्ष पदी संतोष कुंदोजवार यांची तर सचिव म्हणून अमोल आवारी याची निवड करण्यात आली आहे.
जिल्हा क्रीडा,कला,कार्यानुभव निदेशकाची चंद्रपूर येथे विशेष बैठक घेण्यात आली संघटनेच्या विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली तसेच संघटनेची नवीन कार्यकारणी गठीत करण्यात आली त्यात अध्यक्ष संतोष कुंदोजवार,सचिव अमोल आवारी, उपाध्यक्ष शालू काळे,सह सचिव विशाखा गुजर, कार्याध्यक्ष नितीन चौथाले, कोषाध्यक्ष रवींद्र तेलसे, तर सदस्य म्हणून रुपेश वनकर, गणेश आकेवार,अंजली धर्मपुरीवार, राजश्री चहारे,उर्मिला बंदुकवार, संजीवनी बावणे,अश्विनी तेलंग,अनिल झाडे,सुधीर पेंदराम याची निवड करण्यात आली.



