

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
गडचिरोली(दि.1ऑगस्ट):-महाविकास आघाडीच्या कार्यकाळात गडचिरोली येथे मंजूर करण्यात आलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्वतंत्र इमारत आजपर्यंत अस्तित्वात आलेली नाही.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः गडचिरोलीचे पालकमंत्री असताना व त्यांच्या सोबतीला सह पालकमंत्री आशिष जी जयस्वाल असे दोन पालकमंत्री गडचिरोली जिल्ह्यात असताना सुद्धा वैद्यकीय महाविद्यालयाच्या स्वतंत्र इमारती करता जागा उपलब्ध होत नसेल
तर यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ही परिस्थिती सरकारच्या निष्क्रीयतेचे प्रतीक आहे.
याशिवाय, सदर वैद्यकीय महाविद्यालयात खाजगी कंपनीमार्फत नोकर भरती सुरू करण्यात आली असली, तरी आजतागायत ही भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक पात्र तरुण नोकरीच्या प्रतीक्षेत आहेत. ही भरती शासकीय यंत्रणेमार्फत करण्यात यावी, या प्रमुख मागण्यांसाठी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने दिनांक 1 ऑगस्ट 2025 रोजी इंदिरा गांधी चौक, गडचिरोली येथे ‘भीक मांगो’ आंदोलन करण्यात आले. व जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. दरम्यान जिल्हाधिकारी यांनी वैद्यकीय महाविद्यालयाकरीता लवकरच जागा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, भारतीय युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सचिव विश्वजित कोवासे, शहराध्यक्ष सतीश विधाते, सचिव महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अतुल मल्लेलवार, आरमोरी तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे, चामोर्शी तालुका अध्यक्ष प्रमोद भगत, गडचिरोली तालुका अध्यक्ष वसंत राऊत, धानोरा तालुका अध्यक्ष प्रशांत कोराम, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष नितेश राठोड, पर्यावरण सेल अध्यक्ष राजेश ठाकूर, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, किसान सेल जिल्हाध्यक्ष वामनराव सावसागडे, शिक्षक सेल अध्यक्ष दत्तात्रय खरवडे, परिवहन सेल अध्यक्ष रुपेश टिकले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, माजी नगरसेवक नंदू कायरकर, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, नगरसेवक सुमेध तुरे, अनिल कोठारे, राकेश रत्नावार, घनश्याम वाढई, हरबाजी मोरे, जितेंद्र मूनघाटे, काशिनाथ भडके, लालाजी सातपुते, श्रीनिवास ताटपल्लीवार, ढीवरू मेश्राम, प्रफुल आंबोरकर, सुभाष धाईत, अविनाश श्रीरामवार, विजय लाड, रमेश धकाते, प्रफुल बारसागडे, तेजस कोंडेकर, रवींद्र पाल, मजीद सय्यद, कुणाल ताजने, गौरव येनप्रेडीवार, विपुल येलटीवार, सुदर्शन उंदीरवाडे, दिनेश चापले, प्रसाद कवाखें, देवेंद्र बांबोळे, मुखरू देशमुख, मुखरू गेडाम, स्वप्नील गेडाम, लालाजी बावणे, ईश्वर गेडाम, भास्कर गेडाम, विवेक घोंगडे, अभिजित धाईत, पुरुषोत्तम सिडाम, श्रीकांत कठोटे, चोखोबा ढवळे, संदीप भैसारे, नितीन लाडे, सुदर्शन उंदीरवाडे, रवी मेश्राम, हेमंत कोवासे, सौ. पुष्पलता कुमरे, सौ. पौर्णिमा भडके, सौ. कविता उराडे, सौ. रिता गोवर्धन, सौ. सुनीता रायपुरे, सौ. कविता उराडे सह या आंदोलनात जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी, युवक आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.



