युवा नेते रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

    38

    ✒️चांदू आंबटवाड(नायगाव,तालुका प्रतिनिधी)मो:-9307896949

    नायगाव(दि.6डिसेंबर):-जी आमदार वसंतराव चव्हाण यांचे चिरंजीव तथा युवा नेते प्रा. रवींद्र चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त दि. ९ डिसेंबर रोजी नायगाव, उमरी व धर्माबाद युवक काँग्रेसच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजक माणिक चव्हाण यांनी दिली आहे.

    नायगाव विधानसभा मतदारसंघाचे युवा नेतृत्व असलेले प्रा. रवींद्र चव्हाण यांचा वाढदिवस दि. ९ डिसेंबर रोजी असतो. या वाढदिवसाचे औचित्य साधून चव्हाण परिवार व चाहते मतदारसंघात विविध सामाजिक उपक्रम राबवतात. दरवर्षी प्रमाणे यंदाही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार असून त्याची तयारी करण्यात येत आहे. विशेष म्हणजे यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर उदभवलेली परिस्थिती लक्षात घेवूनच कार्यक्रमाचे नियोजन करण्यात येत आहे.

    वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रमाचे आयोजन करतांना सामाजिक जाणीवही ठेवण्यात येते. सर्वात महत्वाची बाब म्हणजे यंदा कोरोना विषाणूच्या विळख्यात नागरिक अडकले असून. विविध उपचारासाठी जाणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे नायगाव विधानसभा मतदारसंघाच्या वतीने नायगाव येथे युवक काँग्रेसचे पदाधिकारी माणिक चव्हाण यांच्या पुढाकारातून भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.

    नायगाव, उमरी व धर्माबाद तालुक्याच्या वतीने हे भव्य रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले असल्याने युवक काँग्रेसच्या तरुणांचा मोठा सहभाग असणार तर आहेच पण सध्या रक्ताचा पडलेला तुटवडा पाहता रक्तदात्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून रक्तदान करण्याची गरज आहे. त्यामुळे तरुणांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून रक्तदान करावे असे आवाहन रक्तदान शिबीराचे आयोजक माणिक चव्हाण यांनी केले आहे.