तुमसर येथील शारदा विद्यालयाचा स्वातंत्र्योत्सव : तिरंग्याखाली देशभक्तीचा महासोहळा

120

 

संजीव भांबोरे
भंडारा-भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर येथे राष्ट्रप्रेमाचा महासोहळा उत्साहात आणि थाटात पार पडला. पूजा शिक्षण संस्थेचे माननीय सचिव रामकुमार महाबीरप्रसादजी अग्रवाल यांच्या शुभहस्ते पवित्र तिरंगा फडकाविण्यात आला. तिरंग्याच्या फडकण्याबरोबरच उपस्थितांच्या हृदयात स्वाभिमानाचे आणि कृतज्ञतेचे असंख्य दीप उजळले.

सोहळ्यास विद्यालयाचे मुख्याध्यापक राहुल डोंगरे, जेष्ठ शिक्षक आर. एम. हरडे, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रपिता महात्मा गांधी व *भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली वाहून वंदन करण्यात आले. त्यानंतर ध्वजस्तंभाची पूजा करून ध्वजारोहणाची मुख्य विधी पार पडली.

विद्यालयातील R.S.P. पथकाने शिस्तबद्ध पावलांनी आणि सलामीने कार्यक्रमाला ऐसपैस उंची दिली. राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत, भारतीय संविधानाचे वाचन, *विद्यार्थ्यांची देशभक्तिपर भाषणे व सांस्कृतिक सादरीकरण यामुळे परिसरात *“भारत माता की जय”*च्या घोषणा दुमदुमल्या. विद्यालयातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण देशभक्तीच्या ओढीने भारावून गेला

आपल्या प्रेरणादायी मनोगतात मुख्याध्यापक राहुल डोंगरे यांनी आवाहन केले –
“ज्यांच्याकडे वेळ आहे त्यांनी तो राष्ट्रसेवेसाठी द्यावा; ज्यांच्याकडे बुद्धी आहे त्यांनी ती समाजहितासाठी खर्च करावी; आणि ज्यांच्याकडे संपत्ती आहे त्यांनी ती राष्ट्रोन्नतीसाठी वापरावी. तेव्हाच राष्ट्रपुरुषांचे, संतांचे व समाजसुधारकांचे स्वप्नातील भारत वास्तवात उतरेल.”

सचिव रामकुमार महाबीरप्रसादजी अग्रवाल* यांनी मंगलमय शुभेच्छा देत विद्यार्थ्यांना आणि उपस्थितांना उद्देशून सांगितले की –
“भारताचे भविष्य या तरुणाईच्या हातात आहे. तिरंग्याखाली दिलेली आजची शपथच उद्याचा भक्कम व प्रगत भारत घडवेल.”

या कार्यक्रमात शालेय कार्यक्रम विभाग, शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग व विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहून रक्तात देशप्रेमाचा संचार झाला. तिरंगा हा केवळ ध्वज नसून तो आमची ओळख, आमची आन, बाण आणि शान आहे हे दृश्य प्रत्येकाच्या मनाला भिडले.

कार्यक्रमाच्या अखेरीस सर्वत्र एकच संदेश दुमदुमला –
*स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाने मिळालेले हे स्वातंत्र्य केवळ उत्सवापुरते नसून, ते आपल्या कृतीतून जपले गेले पाहिजे. देशासाठी जगणे हीच खरी देशभक्ती आहे.