धरणगाव तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धा उत्साहात संपन्न !…

117

▪️बुद्धी चातुर्याचा खेळ म्हणजे बुद्धिबळ – सचिन सूर्यवंशी [ जिल्हा क्रीडा समन्वयक ] 

✒️धरणगाव प्रतिनिधी(पी डी पाटील सर)

धरणगाव(दि.20ऑगस्ट):- येथे क्रीडा व युवक सेवा संचालक महाराष्ट्र राज्य पुणे जळगाव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व पंचायत समिती शिक्षण विभाग धरणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शालेय तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धा अंतर्गत मुलांच्या १४ / १७ व १९ वर्ष आतील स्पर्धांचे आयोजन लिटल ब्लाॅसम स्कूल या ठिकाणी करण्यात आले होते.

            स्पर्धेचे उद्घाटन कुळवाडी भूषण छत्रपती शिवाजी महाराज व सरस्वती माता यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून लिटल ब्लॉसम स्कूलच्या मुख्याध्यापिका आदरणीय पवार मॅडम यांच्या हस्ते करण्यात आले. स्पर्धेचे प्रस्तावित क्रीडा समन्वयक सचिन सूर्यवंशी यांनी केले पंच म्हणून जितेंद्र ओस्तवाल, विनायक कायंदे, यशोदिप पालिवाल, वैभव चौधरी यांनी काम पाहिले.

           गुण लेखक म्हणून फिलिप्स गावीत, ललित डोके, पी डी पाटील यांनी काम पाहिले तर स्पर्धा यशस्वी पणे पार पाडण्यासाठी तालुक्यातील क्रीडा शिक्षक ज्ञानेश्वर घुले, पाठक सर, निलेश चौधरी, निलेश पाटील, पवन बारी, शशीकांत पाटील, दिक्षा पैठणकर मॅडम, विकी पचेरवार यांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार लिटिल ब्लाॅसम स्कूलचे क्रीडाशिक्षक पवन बारी यांनी मानले विजय स्पर्धकांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.