मत विकले तर आमदार शेतकऱ्यांचे का ऐकणार?

348

✍🏻 *”शेतकऱ्यांची दखल कोणी घ्यावी*?”

👉 शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आपण संघटना चालवतो. पण शरद जोशी, राजू शेट्टी, बच्चू कडू, रविकांत तुपकर यांनी जितका अभ्यास केला, तेवढा आपणही करतो. तरी शेतकरी सुखी का नाही?

कारण शेतकरी स्वतः मत विकतो, पाचशे रुपयांत!

🪓 *”मत विकले तर आमदार शेतकऱ्यांची का ऐकणार*?”

मत विकून तुम्ही नेत्यांना आमदार करता, आणि मग त्यांच्याकडून प्रामाणिकपणा व न्याय अपेक्षा करता? दुकानदाराकडून गूळ घेतला, पैसे दिले तर त्याचं गिऱ्हाईक संपतं; तसंच मतदार-आमदार नातं संपतं.

💰 *”चोरीचा पैसा मतदारांना वाटला जातो*”

एकाच मतदारसंघात चाळीस कोटी रुपये वाटप होतात. हा पैसा कुठून येतो? आपल्या करातून. म्हणजे आपण काम करतो, कर भरतो, सरकारकडून तो पैसा काढला जातो आणि निवडणुकीत मत विकणाऱ्यांच्या तोंडात प्रसादासारखा टाकला जातो.

🚩 *”लोकशाही मंदिर बांधण्यासाठी आहे का*?”

राम मंदिर बांधलं म्हणून मतदान, देवी मंदिर बांधलं म्हणून मतदान… हा व्यवहार संविधानात आहे का? लोकशाही विकासासाठी आहे, धर्मजागृतीसाठी नाही. मत विकून मग ‘संविधान बचाव’ ओरडणं म्हणजे विनोद आहे.

⚡ *”खरा शत्रू कोण*?”

मोदी, शहा, भागवत, फडणवीस यांच्या खोट्या आश्वासनांचा तुम्ही बळी पडता. पण खरी चूक शेतकऱ्यांची आहे. कारण स्वतःच आपला सैनिक बेईमान आहे. तोपर्यंत कुठलाही लढा जिंकता येणार नाही.

👉 *शेतकऱ्यांनी प्रामाणिक राहिले पाहिजे,* मत विकणं थांबवलं तरच खरी लोकशाही व संविधान टिकेल.

नाहीतर ही व्यवस्था तुमच्याच करातून पैसा काढून पुन्हा तुमचीच खरेदी विक्री साठी वापरेल.

  जी महिला अब्रू विकते.तिची काय किंमत राहिल?जो शेतकरी मत विकतो,त्याची राजकारणात काय किंमत राहिल?कोण दखल घेईल?एकिकडे स्वताला अन्नदाता म्हणायचे,मालक म्हणायचे आणि दुसरीकडे स्वताला विकून टाकायचे?

✒️शिवराम पाटील(महाराष्ट्र जागृत जनमंच)