

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : शेतकऱ्याच्या शेतातील विहिरीसाठीच्या मोटारीला लागणारी दोन आरोपींना अटक करून चोरीस गेलेली तीन फेज 1500 फूट मोटर केबल आरोपींकडून हस्तगत करण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे आणि स्टाफला यश आले यां दोन्हीही आरोपीना अटक केली आहे.
पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ लुबाळ राहणार मासाळवाडी, म्हसवड, तालुका माण, जिल्हा सातारा यांनी त्यांच्या शेतातील 3 फेज केबल 1500 फूट लांबीची अज्ञात चोरट्याने चोरून नेले बाबत म्हसवड पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल केलेला होता. या गुन्ह्याच्या तपासाच्या अनुषंगाने पुढील कार्यवाही चालू असताना म्हसवड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अक्षय सोनवणे यांनी स्टाफसह सदर परिसराची पाहणी करून संशयित आरोपीं बाबत तांत्रिक विश्लेषण व इतर गोपनीय माहितीच्या आधारे माहिती घेऊन निष्पन्न केले आणि या आरोपींना पकडण्याकरिता शोध मोहीम राबवली. या दोन्ही आरोपींना माळशिरस बाजूकडे पळून जाताना पेट्रोलिंग दरम्यान चोरलेल्या 1500 फूट मोटर केबल सह ताब्यात घेतलेले असून सदर आरोपींकडे विचारपूस केली असता त्यांनीच ही चोरी केल्याचे कबूल केले असून संजय महादेव दडस,राहणार मासाळवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा, सध्या राहणार चादापुरी, तालुका माळशिरस, जिल्हा सोलापूर व तुकाराम आप्पा लुबाळ, राहणार मासाळवाडी, तालुका माण, जिल्हा सातारा.
वरील दोन्ही आरोपींना अवघ्या 24 तासात अटक करून त्यांच्याकडून गुन्ह्यात चोरलेली तब्बल 1500 फूट लांबीची थ्री फेज केबल जप्त करण्यात म्हसवड पोलिसांना यश आलेले असून गुन्ह्यातील मालाची शंभर टक्के रिकवरी करण्यात आलेली आहे.
सदरची कामगिरी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षक श्री तुषार दोशी सर,अप्पर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रणजीत सावंत सर यांच्या मार्गदर्शनाखाली म्हसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक, अनिल वाघमोडे,शहाजी वाघमारे, नीता पळे, नवनाथ शिरकुळे, अभिजीत भादुले, महावीर कोकरे यांनी केलेली आहे.
सदर गुन्ह्याचा उलगडा अवघ्या 24 तासात लावल्याबद्दल उपविभागीय पोलिस अधिकारी रणजीत सावंत सर यांनी म्हसवड पोलीस ठाण्यास भेट देऊन या गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतलेली असून या आरोपींनी अजून काही गुन्हे केले आहेत का याबाबत तपास चालू आहे. सदरचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या आदेशाने महिला पोलीस हवालदार नीता पळे या करीत आहेत.



