

‘समकीत के ६७ बोल’ यामधील तिसरा बोल ‘विनय’ या गुणाला समर्पित आहे. विनय गुणाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे. विनय फक्त दाखवण्यासाठी नव्हे तर अहोभाव मनात ठेऊन करायचा असतो. विनय गुणालाच सम्यकत्व किंवा समकीतचे प्रमुख लक्षण सांगितले गेले आहे. विनय गुणाचे महत्त्व स्पष्ट करताना विनयी आणि अविनयी गोष्ट सांगण्यात आली. त्या दोन्ही शिष्यांना कुष्ठरोग झाला. गुरुच शिष्यांची त्यांची सेवा करत असत. त्यांच्या कुटीच्या बाहेर गुरुंना साप दिसला. तो तेथून जाण्या आधी गुरुंनी दोन्ही शिष्यांना सापाचे दात मोजण्याची आज्ञा केली. अविनयी शिष्याने गुरुंचे एकले नाहीच परंतु तो विनयी शिष्याला फितवू लागला, गुरू सेवा करायला कंटाळले त्यामुळे आपल्याला संपविण्यासाठी गुरुंनी हा आदेश दिला आहे. विनयी शिष्याने गुरुंचे मोठ्या श्रद्धेने ऐकले.
सापाने त्या शिष्याला चावा घेतला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याचा कुष्टरोग बरा होऊन नवी उजळ कांती त्याला मिळाली. त्याचा फायदाच झाला. अजून स्पष्ट करताना बोर आणि द्राक्षाचे ही उदाहरण प्रस्तूत केले. लौकीक विनय, अर्थ विनय, काम विनय, भय विनय आलि लोकोत्तर विनय अशा चार प्रकारांवर ही भाष्य केले गेले. प. पू. डॉ. इमितप्रभाजी म.सा. यांनी अत्यंत ओघवत्या शैलीत भाविकांना समजावून सांगितले.
फुल दिसायला सुंदर नसेल, करोडो रुपयांचा बंगला असेल परंतु त्यात सुगंध नसेल आणि त्या किंमती बंगल्यात माणूस राहत नसेत तर काय उपयोगाचे? त्याच प्रमाणे मनुष्यात विनय नावाचा गुण नसेल तर तो माणूस काय कामाचा? आज घराघरात तक्रारी वाढल्या आहेत. त्याचे मुख्य कारण म्हणजे ‘विनय’ आणि ‘सहनशीलता’ कमी झालेली आहे. जैन धर्मात प्रभू महावीर स्वामी यांनी देखील ‘विनय’ गुणाचे महत्व सांगितलेले आहेत. इतकेच नव्हे तर मुस्लिम धर्मासह अन्य प्रमुख धर्मात विनय गुणाबाबत सांगण्यात आलेले आहे. विनयाचे उदाहरण स्पष्ट करण्यासाठी भगवान महावीर स्वामींचे शिष्य गौतम स्वामी जे विनयी होते (इंद्रभूती गौतम) आणि अविनयी असलेले गोशालक यांचे उदाहरण देण्यात आले. मन, वचन आणि काया विनय असे तीन प्रकार स्पष्ट करून सांगण्यात आले. या सोबतच सेवा, निश्चयी मन, निःस्वार्थ सेवा (समर्पण), सेवा करण्यात सदैव तत्पर असे चार लक्षणे देखील प.पू. उन्नतीप्रभाजी म.सा. यांनी आजच्या कथन केले.
✒️शब्दांकन:-किशोर कुळकर्णी(मो:-9422776759)



