समाजमनाला हादरवणारा प्रबोधनकार – प्राचार्य राहूल डोंगरे सर”

85

 

संजीव भांबोरे
भंडारा –दारिद्र्याच्या गर्तेत जन्म घेऊनही आशेची ज्योत विझू न देता, ज्ञानाचा दिवा अखंड पेटवत ठेवणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे प्राचार्य राहूल डोंगरे सर.
खरबीच्या मातीत उमललेलं हिरेमाणक – वडील प्रेमलालजींच्या श्रमातून आणि आई अंजना यांच्या कष्टातून घडलेलं तेजस्वी रत्न!
उपाशीपोटी दिवस काढले, तुटपुंज्या साधनांवर शिक्षण घेतलं; पण जिद्द, उमेद आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी आयुष्याला दिशा दिली.शिक्षक म्हणून – विद्यार्थ्यांचा खरा मार्गदर्शक.
वक्ता म्हणून – समाजमनाला हादरवणारा प्रबोधनकार. लेखक व पत्रकार म्हणून – सत्याचं शस्त्र धारण करणारा निर्भीड समाजसेवक.कवी, गीतकार म्हणून – भावविश्वाला स्पर्श करणारा झरा.त्यांच्या कार्याचा व्याप केवळ शाळा-महाविद्यालयापुरता मर्यादित नाही.बुद्ध, शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांची पेरणी,अंधश्रद्धा, भूतभानामती, अन्यायकारक रुढींवर सतत प्रहार,
वृक्षारोपण, व्यायाम, प्राणायामातून आरोग्यप्रबोधन,तर कोरोनाकाळात जीव धोक्यात घालून लोकांच्या सेवेसाठी धावणं –ही त्यांची बहुआयामी समाजसेवा आहे.
याहूनही महत्त्वाचं म्हणजे –
राष्ट्रमाता जिजाऊ, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर आणि १४० कोटींची आई रमाई यांचे विचार समाजात रुजविण्याचं, स्त्रियांच्या मनात कणखर बाणा जागविण्याचं, आत्मविश्वास वाढविण्याचं कार्य प्राचार्य डोंगरे सर सातत्याने करत असतात.
त्यामुळे ते आजच्या काळातील स्त्रीशक्तीच्या जागरणाचे अग्रदूत ठरतात.शारदा विद्यालय व कन्या कनिष्ठ महाविद्यालय, बजाज नगर, तुमसर येथे प्राचार्य म्हणून त्यांनी उत्तम अध्यापन, शिस्तबद्ध प्रशासन, सुसंस्कारित विद्यार्थी आणि दृढ पालक-शिक्षक संबंध निर्माण केले.
आज अनेक शिक्षक व प्राचार्य आपापल्या चौकटीत काम करतात; पण प्राचार्य राहूल डोंगरे सर समाजाच्या चौकटी मोडून व्यापक प्रबोधन करतात. त्यामुळेच विद्यार्थी त्यांना आपली “आण, बाण आणि शान” मानतात.त्यांच्या आयुष्याची खरी ताकद म्हणजे त्यांचं कुटुंब – पत्नी सौ. सुगंधा यांची साथ, मुलगा प्रयास (डेव्हिड) आणि मुलगी अपेक्षा यांचं संगोपन. घर आणि समाज यांचा सुंदर समतोल साधत त्यांनी एक आदर्श पितृत्व आणि आदर्श समाजसेवकत्व घडवलं आहे.आज प्राचार्य राहूल डोंगरे हे फक्त तुमसर नगरीचे नाहीत, तर संपूर्ण भंडारा जिल्ह्याचा अभिमान आहेत.त्यांचं आयुष्य एकच शिकवण देतं –“संघर्ष हा अडथळा नाही, तर यशाकडे नेणारा खरा मार्ग आहे!”
त्यांच्या जन्मदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा!आयुष्य मंगलमय आणि दीर्घायुषी होवो!विचारांचा दीप सदैव प्रज्वलित राहो!
*प्रेरणेचा झरा अखंड वाहत राहो*!