२३ सप्टेंबर रोजी संगीता ठलाल, दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर

45

 

 

 

*कुरखेडा: -* मुळ गाव देऊळगाव येतील व सध्या कुरखेडा येथे वास्तव्यास असणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता संतोष ठलाल मु. देऊळगाव /कुरखेडा जि.गडचिरोली येथे राहणाऱ्या ह्या सामान्य गृहिणी, शेतकरी महिला आहेत. इयत्ता चौथ्या वर्गात शिकत असताना त्यांनी लिखाणाचा छंद जोपासला. तशीच त्यांना सामाजिक क्षेत्रात सुद्धा आवड होती.लग्नानंतर एकत्र कुटुंबात राहून शेतीचे कामं तसेच कुटुंब सांभाळून ज्वलंत विषयावर व सामाजिक विषयावर विविध वृतपत्रात, दिवाळी अंकात, पुरवणीत त्यांनी लिखाण केले आहेत. सोबतच बऱ्याच पुस्तकांना शुभेच्छा पत्र सुद्धा लिहून दिले आहेत. बऱ्याच पुस्तकांवर समीक्षा केली आहे. तसेच विविध वृतपत्रात त्यांचे लिहिलेले साहित्य प्रकाशित होत असतात. त्यांची अनेक कार्यक्रमात सन्मानपूर्वक उपस्थिती दिसते, बऱ्याच कार्यक्रमात त्यांनी पदे भुषविले आहेत व त्यांनी चांगल्या कार्याला पाठींबा सुद्धा दिला आहे. त्यांचे शासकीय व इतर संस्थाकडून अनेक सत्कार सुद्धा झाले आहेत. त्यांचा दैनंदिन सकाळ सदर असलेला “विचारधारा” समाजप्रबोधन करणारा व अत्यंत लोकप्रिय झालेला आहे.सोबतच “रानभाज्यांच्या जगात” ह्या उपक्रमामुळे त्यांची समाजात व साहित्य क्षेत्रात विशेष ओळख आहे. म्हणून गेल्या ३०तारखेला केंद्र सरकारच्या साहित्य अकादमी दिल्लीच्या वतीने तसेच माध्यमिक आश्रम शाळा चांदाळा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या चांदाळा या गावी “ग्रामालोक” या कार्यक्रमात त्यांना निमंत्रित करण्यात आले होते.व रानभाज्यांवर आणि वन औषधीवर त्या़चे कथन झाले आहेत. सोबतच त्यांनी नि:स्वार्थ भावनेने कशाचीही अपेक्षा न करता अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेत.
प्रचंड संघर्षमय जीवनप्रवास बघून गेल्या काही दिवसांपूर्वी त्यांची नि:स्वार्थ साहित्य सेवा व सामाजिक कार्य बघून रेडिओ आकाशवाणी केंद्र नागपूर येथे त्यांची मुलाखत सुध्दा झालेली आहे. दुर्गम भागातील महिला कलागुणांच्या माध्यमातून व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन माणुसकीच्या नात्याने कार्य करणाऱ्या साहित्यिक, सामाजिक कार्यकर्त्या संगीता ठलाल यांचे समाजासाठी असलेले भरीव योगदान व साहित्य सेवा बघून नागपूर प्रस्तुती दूरदर्शन सह्याद्री वाहिनीने त्यांची दखल घेतली आहे. सोबतच मु.डव्वा जि.गोंदिया येथील सरपंच योगेश्वरी चौधरी यांच्या सुद्धा कार्याची दखल घेतली आहे. या मुलाखतीचे प्रसारण दि.२३ तारखेला, वार मंगळवार दुपारी ठीक १२ वाजता “संकल्प सामाजिक जाणीवेचा” या विषयावर दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर संगीता ठलाल यांची मुलाखत होणार आहे. निर्माती मीनल पाठराबे, मुलाखतकार प्रज्ञा जिवनकर तसेच दूरदर्शन सह्याद्री वाहिनीचे संगीता ठलाल यांनी आभार मानले. संगीता ठलाल सारख्या सामान्य महिलेची मुलाखत दूरदर्शन सह्याद्री वाहिनीवर होणार हे कळतात सर्वच स्तराहून त्यांचे अभिनंदन केले जात आहे. ही दखल सामाजिक क्षेत्रासाठी, साहित्य क्षेत्रासाठीच नव्हे तर जिल्ह्यासाठी सुद्धा अभिमानाची बाब आहे.