

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489
भंडारा -पवनी तालुक्यातील चंद्रमणी बुद्ध विहार तहसील परिसर येथे बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचे प्रणेते पूज्य भन्ते विनाचार्य यांच्या नेतृत्वाखाली पवनी येथे भव्य धम्म ध्वज यात्रा व जनसंवाद परिषदेचे चंद्रमणी बुद्ध विहार तहसील परिसर पवनी येथे आयोजन करण्यात आलेले होते.
या धम्मध्वज यात्रा व जनसंवाद परिषदेत लाखो बौद्ध अनुयायी उपस्थित झाले होते. यावेळी सुप्रसिद्ध कव्वाल विकास राजा यांचा संगीतमय प्रबोधन बुद्ध भीम गीतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. पूज्य भंते विनाचार्य म्हणाले की, तोपर्यंत बोधगया येथील बौद्ध विहार बौद्धांच्या हातात देणार नाही तोपर्यंत लढा सुरूच राहणार व 1949 चा बी टी ऍक्ट जोपर्यंत रद्द होणार नाही, तो पर्यंत लढा सुरूच राहणार असल्याचे पूज्य भदंत विनाचार्य यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता रमेश लोणारे, मनोज बनसोड, सुनील जीवनतारे, नलिनीताई जांभुळकर, समुद्रेकर नलिनीताई मयूर, नवनाथ आखरे, एडवोकेट महेंद्र गोस्वामी, वंदना खापर्डे, प्रमिला टेंभुर्णे,अस्मिता माटे, ज्योती राऊत, तुषार रंगारी, करुणा गजघाटे, शैलेश मयूर, झुंजार रंगारी, हिना रंगारी, नरेंद्र अंबादे, मुनिश्वर बोदलकर, उमाकांत राऊत यांनी व पवनी तालुक्यातील सर्व बुद्ध विहारातील बौद्ध उपासक उपासिका यांनी सहकार्य केले.



