कै.मैनाबाई बुंदेले प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक मंडळातर्फे माजी नायब तहसीलदार प्रमोद नागपुरे यांचा सत्कार

99

 

अमरावती (प्रतिनिधी )- प्रमोद नागपुरे यांनी दर्यापूर व अचलपूर येथे नायब तहसीलदार असताना महसूल मध्ये काम करीत असताना अनेक शेतकरी बांधवांची प्रकरणे हाताळून त्यांना न्याय मिळवून दिला. संजय गांधी निराधार योजनेत काम करीत असताना अनेकांची प्रकरणे हाताळून त्यांना मासिक मानधन मिळवून दिले. पुरवठा विभागात काम करीत असताना गोरगरीब व गरजू व्यक्तींना शिधा पत्रिका मंजूर करून त्यांना शासकीय धान्य मिळवून दिले. धाडी टाकून अनेक व्यापाऱ्यांना वठणीवर आणले. साखरचा काळा बाजार करणाऱ्या व्यापाऱ्यांची २५० कट्टे साखर जप्त करून शासकीय गोदामात सरकारी साखर म्हणून जमा केली. पेट्रोल – डिझेल पंप तपासणी करून भेसळ व वजन बरोबर मिळेल अशी कार्यवाही केली. श्री नागपुरे महानुभाव पंथांचे उपासक असल्यामुळे अनेक कार्यक्रमात सहभागी असतात. समाजोपयोगी सेवाकार्यामुळे त्यांचा मुलगा IES झाला असून बंगलोर येथे Executive Engineer या पदावर क्लासवन ऑफिसर आहे. मुलगी B .E. ,M .S . असून ती Ireland मध्ये चांगल्या उच्च श्रेणी पदावर कार्यरत आहे.असे हे समाजसेवी व्यक्तिमत्व असलेले श्री प्रमोद नागपुरे यांचे मी अभिष्टचिंतन करतो.”असे विचार प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा.अरुण बुंदेले यांनी व्यक्त केले .

ते कै.मैनाबाई बाबारावजी बुंदेले स्मृती प्रतिष्ठान व ज्येष्ठ नागरिक मंडळ, शिवटेकडी तर्फे हॉटेल आमंत्रण, समाजसेवी व्यक्तिमत्त्व असलेले माजी नायब तहसीलदार मा.श्री प्रमोदभाऊ नागपुरे यांचे अभिष्टचिंतन प्रतिष्ठानचे अध्यक्ष अभंगकार व साहित्यिक प्रा.अरुण बाबारावजी बुंदेले व ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सर्व सदस्य यांनी शाल, पुष्पगुच्छ व प्रा.बुंदेले यांचा स्वरचित ” अभंग तरंग ” हा अभंग संग्रह भेट देऊन सत्कार करून अभिष्टचिंतन केले. याप्रसंगी प्रा.अरुण बुंदेले विचार व्यक्त करीत होते.

ज्येष्ठ नागरिक मंडळ, शिवटेकडी तर्फे मंडळातील प्रा.नाफडे सर (H.O.D. Physics ), प्राचार्य श्री दिनकरराव राऊत,गुलाबराव बागडे (व्यवस्थापक, बँक ऑफ बडोदा), एकनाथराव भडांगे (अधिक्षक, जि.प.), सुभेदार अशोकराव राऊत, गायकवाड (अधिक्षक ,दिवाणी होर्ट ), प्रा. किशोर देशमुख (H.0.D ), मधुकरंशव ठाकरे(अधिक्षक, दुग्ध विकास), मधुकरराव वाघ ( Dy. Bng.) या सर्व सदस्यांनी मा.श्री प्रमोदभाऊ नागपुरे यांचा सत्कार करून सर्वांनी अभिष्टचिंतन केले व मनोगतातून हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच प्राचार्य श्री एकनाथराव गावंडे, गणेशराव ठाकरे सर, डॉ. बी. आर. देशमुख ( Ret. C . S .), बिल्डर मधुकरराव डाफे, इथापे सर ( Ret. Director of Education ), चंद्रकांत कदम (Bank Officer), व्ही. एस. गोळे सर ,नानासाहेब बोके (संचालक, सरस्वती बुक्स अँड स्टेशनर्स), नानासाहेब देशमुख Ret. Agri officer) प्राचार्य येनकर सर, खडसे साहेब (IFS),कडू साहेब Ret Dy. Collector), मोहन पातूरकर Ret.Dy. collector) तसेच सहकारी तहसीलदार, नायब तहसीलदार यांनी श्री प्रमोद नागपुरे यांचे अभिष्टचिंतन केले व हार्दिक शुभेच्छा दिल्या. तसेच दर्यापूर, चांदूर बाजार, अचलपूर, नांदगाव खंडेश्वर तसेच अनेक शहरांमधून सुमारे ५०१ मित्र मंडळी व आप्तेष्टांनी Online शुभेच्छा दिल्या.