अखेर माजी समाज कल्याण सभापती यांच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका शेतकऱ्यांचे जुलै महिन्याचे धानाचे चुकारे शासनाकडून 114 कोटी मंजूर

64

 

संजीव भांबोरे
भंडारा -माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे यांनी महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांना 28 जुलै 2025 ला पत्र पाठवून 28 सप्टेंबर 2025 पर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे न दिल्यास 29 सप्टेंबर 2025 ला जिल्हा मार्केटिंग भंडारा कार्यालयाचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला होता. अखेर शासनाने त्वरित दखल घेऊन
उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर 2024 -25 मध्ये धान दिले. परंतु अजून पर्यंत शासनाकडून त्यांना पैसे मिळाले नाही. माहे 2024- 25 जुलै मध्ये ज्या शेतकऱ्यांनी शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर धान्य दिले .त्यांचे पेमेंट 28 सप्टेंबर 2025 पर्यंत दिले नाही तर 29 सप्टेंबर 2025 ला दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांचा लिलाव करण्याचा इशारा दिला होता. परंतु शासनाने वेळीच दखल घेऊन शेतकऱ्यांच्या उन्हाळी धानाच्या चुकाऱ्याचे पैसे 24 सप्टेंबर 2025 ला 114 कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत. व त्याची प्रक्रिया 25 सप्टेंबर 2025 पासून सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खाते अदा करण्याचे कामकाज जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेले आहे . व त्यासंबंधीचे पत्र माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंभुर्णे
यांना दि महाराष्ट्र स्टेट को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांच्याकडून 26 सप्टेंबर 2025 ला प्राप्त झाले असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आलेली आहे.