कृभकोची भंडारा येथे विक्रेता परिषद संपन्न

45

 

 

 

संजीव भांबोरे, विशेष प्रतिनिधी, मो.70663 70489

भंडारा: कृषक भारती को-ऑपरेटिव्ह लिमिटेड (KRIBHCO – कृभको), भंडारा यांच्या वतीने दिनांक २६ सप्टेंबर २०२५ रोजी भंडारा येथील हॉटेल शिवम येथे भव्य ‘विक्रेता परिषद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भात पिकाची लागवड पद्धती आणि खतांच्या व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन करण्यात आले.
या कार्यक्रमाला अध्यक्ष स्थान मा.श्री. अभिजीत पटवारी, जिल्हा कृषी गुणनियंत्रक अधिकारी (DQCI) भंडारा भूषवले. प्रमुख पाहुणे कृभको पुणे (महाराष्ट्र) चे राज्य विपणन व्यवस्थापक श्री. बिपिन एस. चव्हाण, कृभको नागपूरचे वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक श्री. जितेंद्र टी. भामरे आणि महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सागर विरखरे उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात हि परिषदेत उपस्थित मान्यवरांच्या स्वागत व सत्काराने झाली.
विक्रेता परिषदेमध्ये मा.श्री. जितेंद्र भामरे, वरिष्ठ विभागीय व्यवस्थापक, कृभको नागपूर, यांनी कृभको बियाणे, कृभको रासायनिक खते, कृभको जैविक खते तसेच कृभको सिटी कंपोस्ट, शेतकऱ्यांसाठी माती परीक्षण (Soil Testing) करणे किती आवश्यक आहे यावर जोर दिला. माती परीक्षणाच्या अहवालानुसारच खतांची मात्रा (Fertilizer Doses) निश्चित करावी. ‘भात पिकाला लागवडीच्या वेळी आणि फुटवे येण्याच्या अवस्थेत (Tillering Stage) नत्र, स्फुरद (Phosphorus) आणि पालाश (Potash) यांची योग्य मात्रा देणे महत्त्वाचे आहे,’ असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमामध्ये मा. श्री. महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ (MAIDC) भंडाराचे जिल्हा व्यवस्थापक श्री. सागर विरखरे यांनी बफर स्टॉक तसेच कृभको च्या उत्पादनाबद्द्ल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक लाभलेले कृभको पुणे (महाराष्ट्र) चे राज्य विपणन व्यवस्थापक श्री. बिपिन एस. चव्हाण विक्रेता परिषदेमध्ये उपस्थितांना भात पिकाच्या लागवडीची योग्य पद्धत आणि खतांचे प्रमाण (Fertilizer doses) यावर विस्तृत माहिती देण्यात आली. तसेच, भात पिकातील खत व्यवस्थापन (Fertilizer Management), जैविक खते (Bio fertilizer) आणि सिटी कंपोस्ट (City Compost) चे महत्त्व यावर मार्गदर्शन करण्यात आले. याव्यतिरिक्त, जस्त सल्फेट (Zinc Sulphate) च्या महत्त्वावर पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन (PPT Presentation) द्वारे सादरीकरण करण्यात आले.
कार्यक्रमात कृभको (KRIBHCO) कंपनीच्या नीम-कोटेड युरिया (Neem-Coated Urea) आणि डीएपी (DAP) यांसारख्या प्रमुख खतांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट करण्यात आले. नीम-कोटेड युरियामुळे नत्र (Nitrogen) पिकाला हळूहळू उपलब्ध होतो, ज्यामुळे खताची कार्यक्षमता (Fertilizer Use Efficiency) वाढते आणि शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी होण्यास मदत होते. भात पिकासाठी जस्त सल्फेट (Zinc Sulphate) हे सूक्ष्म अन्नद्रव्य (Micronutrient) का महत्त्वाचे आहे, याबद्दल सादरीकरण झाले. जस्ताच्या कमतरतेमुळे पिकाची वाढ खुंटते आणि ‘खैरा’ रोग (Khaira Disease) होण्याची शक्यता असते. त्यामुळे लागवडीच्या वेळी जस्त सल्फेटचा वापर कसा करावा यावर विशेष माहिती देण्यात आली.
कृभकोच्या वतीने शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध नवीन कृषी तंत्रज्ञानाची माहिती देण्यात आली. यामध्ये बियाणे (Seeds), पीक संरक्षण उत्पादने (Crop Protection Products) आणि शेतीमधील आधुनिक उपकरणांचा समावेश होता. वितरकांनी (Dealers) या सर्व माहितीचा उपयोग शेतकऱ्यांना योग्य वेळी योग्य सल्ला देण्यासाठी करावा, असे आवाहन श्री. बिपिन एस. चौहान यांनी केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.श्री. अभिजीत पटवारी, जिल्हा कृषी गुणनियंत्रक अधिकारी (DQCI) भंडारा यांनी रासायनिक खतांच्या संतुलित वापरासोबतच सेंद्रिय खते (Bio-fertilizer) आणि सिटी कंपोस्ट (City Compost) चा वापर वाढवण्याचे आवाहन करण्यात आले. यामुळे जमिनीचा पोत (Soil Structure) सुधारतो, पाण्याची धारण क्षमता (Water Holding Capacity) वाढते आणि पर्यावरणाचेही रक्षण होते. सेंद्रिय खतांमध्ये असलेल्या जिवाणूमुळे (Microbes) पिकांना अन्नद्रव्ये सहजपणे उपलब्ध होतात,असे मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मध्ये मा.श्री. नाना हिवसे,नितीन मार्केटिंग भंडारा यांनी कृभको ने आयोजित केलेल्या कार्यक्रमाची स्तुती केली. सहकार क्षेत्रात होते असलेले दिवसेन दिवस बदल तसेच सहकार क्षेत्राचे म्हत्तव त्यांनी समजून सांगितले. भाषणामध्ये सर्व उपस्थित मान्यवरांना मार्गदर्शन केले. कृभको चे धन्यवाद मानले.
क्षेत्रीय प्रतिनिधी श्री. देवेश सापधरे कृभको यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि त्यांनी आपल्या भाषांना मध्ये कृभको चे नवीन खते कृभको सिवारिका आणि झिंक सल्फेट बद्दल माहिती दिली.
कृभकोने आयोजित केलेल्या या परिषदेमुळे भंडारा जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांना भात पिकाच्या आधुनिक तंत्रज्ञानाची आणि योग्य खत व्यवस्थापनाची माहिती मिळाली, ज्यामुळे ते शेतकऱ्यांना अचूक मार्गदर्शन करू शकतील आणि कृषी उत्पादनात वाढ होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला भंडारा येथील सुमारे ७५ ते ८० वितरक (Dealers), किरकोळ विक्रेते (Retailers) आणि सोसायटी सदस्य उपस्थित होते. विक्रेता परिषद हि १७ ते २ ऑक्टोम्बर या स्वच्छता पंधरवड्या अंतर्गत घेण्यात आली.