पोलिसांनी हे विसरू नये आपण ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत ?

    73

    भारत हा कधी काळी कृषीप्रधान देश होता.या देशातील शेतजमीन सुजलाम सुपलम होती. ती सोन्यासारखे अन्न धान्य पिकवीत होती.तिच्यावर शेतकरी, शेतमजूर शेठ,सावकार बारा बुलतेदार गुण्यागोविंदाने नादात होती.जात,धर्म आणि तेहतीस कोटी देव देविका तेव्हा सुद्धा होत्या.पाप,पुण्याच्या व स्वर्ग नरकाच्या भितीमुळे कोणी कोणाला नाहक त्रास देत नव्हता.देवा धर्माची थोडया भीतीने लोक नितीमत्तेने वागत होती. गावांतील वडीलधाऱ्याचा धाक होता सर्वात मोठे म्हणजे लोक काय म्हणतील?.समाज काय म्हणेल ?.या भीतीमुळे अन्याय अत्याचारांचे प्रमाण कमी होत होते.लेखी कोणत्याही व्यवहार नव्हता.शब्दाला मोठी किंमत होती.शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा योग्य मोबदला मिळत होता,आता सर्वच राजकीय बदलला झाला आहे. प्रत्येक अन्याय अत्याचार, शोषणाला जाती धर्माचा राजकीय पक्षांचा गंध लागला आहे. 

    पंजाब हरियाणा राज्यातील शेतकरी ज्या जिद्दीने आंदोलन करीत आहेत त्यांचा प्रचंड संघटीतपणा संकटांना सामोरे जाण्याची निर्धार पक्का झाला आहे. आणि त्याला रोखण्यासाठी सरकारने मोठा पोलीस फौज फाटा उभा केला आहे, तो सर्व सुरक्षा यंत्रणा ठेवणारा पोलीस, निरीक्षक,अधिकारी बहुसंख्येने शेतकरी, शेतमजूर मागासवर्गीय ओबीसी समाजातील आहे.त्यांना त्यांच्या वरिष्ठांनी दिलेल्या आदेशाचे पालन करणे आवश्यक आहे. तरी सुद्धा पोलिसांनी हे विसरू नये आपण ही शेतकरी, शेतमजूरांची मुले आहोत ?.अमेरिकेतील गोऱ्या पोलिसांनी एका कृष्ण वर्णीय जॉर्ज फ्लोयड निरपराध माणसाची मान गुडग्याखाली दाबून त्याला मारले त्या विरोधात प्रचंड प्रमाणात आंदोलने झाली तेव्हा राष्ट्र अध्यक्षांनी पोलिसांना आंदोलकांवर कडक कारवाई करावी असा आदेश दिला असता पोलिसांनी त्यांना देशाच्या संविधानानुसार कारवाई करण्यास ठामपणे विरोध केला होता.

    देशहितासाठी साविधानहीतासाठी संवेदनशीलता दाखवून त्यांनी ती हिंमत दाखवली होती. भारतातील पोलीस अशी देशहितासाठी साविधानहीतासाठी संवेदनशीलता दाखवतील?.पोलिसांनी हे विसरू नये आपण ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत ?.आता शेतमजुर,शेतकाऱ्या वरील अन्याय,अत्याचार आणि आर्थिक शोषण मोठया प्रमाणात वाढलेले आहे.शेतकऱ्यांचे शेतमजुरांचे मुलंमुली ग्रामसेवक ते सर्व सरकारी कार्यालयात अधिकारी असतांना. ग्रामीण भागात, कृषिउत्पन्न बाजार समितीत कोण कर्मचारी अधिकारी असतात?. कारण आम्ही शेतकरी,शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो?.गावांत एकत्र शिक्षण घेतांना कधी जात आडवी येत नाही. कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेतांना जात आडवी येत नाही. पण शिक्षण घेतांना अडचणीच्या वेळी जेव्हा जातीमुळे आर्थिक मदत मिळते तेव्हा मात्र मुलांच्या मनातील जाती बद्दल तीव्र संवेदनां जाग्या होतात.

    तेव्हा आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे कोणी विसरत नाही.पण जे शेतमजूरांचे नव्हे तर सधन शेतकरी कुटुंबातील मुलं आहोत म्हणून आम्हाला आर्थिकदृष्ट्या मदत मिळत नाही. हे काही मुलामुलींना पचविणे अशक्य जाते.तेव्हा शाळा,कॉलेज मध्ये एकत्र शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींना स्वतःच्या जातीचा गर्व वाटतो दुसऱ्या जातीचा तिरस्कार त्यातुनच मेडिकल कॉलेज मध्ये शिकणाऱ्या मुलीत सुद्धा डॉ पायल तडवी सारखी मुलगी आत्महत्या करण्यासाठी मजबूर होते. खेड्यातील मुलगी,प्राथमिक शाळा ते कॉलेज करून इथं पर्यत पोचते तेव्हा तिला कितीतरी आठवणी पाठलाग करीत असतात. तेव्हा ती म्हणते आम्ही शेतमजूरांची मुलगी आहे हे विसरलो नाही.
    कॉलेज मध्ये गेल्यावर मुलामुलींना वेगळ्या जगात आल्या सारखे वाटते.

    तिथे अज्ञाना पेक्षा विज्ञान सर्व श्रेष्ठ आहे हे समजते,जात,धर्म,प्रांत सीमारेषा पुसट होतात.धर्म संस्कार, सांस्कृतिक रितीरिवाज यांच्या मर्यादा स्पष्ट होतात. तेव्हाच भारतीय जागरूक नागरिक बनण्यासाठी पदव्युत्तर शिक्षण घेतले पाहिजे.आमचे आईवडील शेतकरी, शेतमजूर होते आम्ही शेतकरी, शेतमजूर बनण्यासाठी शिक्षण घेत नाही. तर डॉक्टर, वकील, प्राध्यापक, बँक मॅनेजर, बिजनेस मॅन,आय पी एस,आय ए एस उच्चशिक्षित उच्च पदस्थ अधिकारी बनण्यासाठी शिक्षण घेत आहोत तेव्हा आम्ही जात,धर्म,प्रांत,भाषा सर्व विसरलो पाहिजे.गेल्या वीस पंचवीस वर्षात हे सर्व हे शिक्षण घेतांनाच विसरून चालणार नाही यांची जाणीवपूर्वक तयारी करून घेतली जाते. त्यामुळेच सरकारी निमसरकारी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी कर्तव्ये दक्ष न राहता आपली ओळख जातीला घेऊन पुढे येत आहे. पूर्वी सर्व शाळा, कॉलेज, सरकारी कार्यालयात नमस्काराने सुरुवात होत होती.आता त्यात तुकडे पडलेत. आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे विसरलो नाही म्हणणारे खुप कमी भेटतात.तसेच आम्ही शेतकऱ्यांची मुले आहोत हे विसरलो नाही हे सांगणारे पुढे येत नाही.

    शेतमजुरावर अन्याय करतांना जात पाहिली जाते.शेतकऱ्यांना तरी कुठे न्याय मिळवून दिला जातो. शेतकऱ्यांची,शेतमजुरांची मुलंमुली ग्रामसेवक ते सचिवालय पर्यत पोचली त्यांना आज जाणीव आहे काय की आम्ही शेतकऱ्यांची,शेतमजुरांची मुलंमुली आहोत म्हणून ?.आम्ही शेतमजूरांची मुले आहोत हे ते विसरले नाहीत काय?. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर, प्राध्यापकाचा मुलगा प्राध्यापक, वकिलाचा मुलगा वकील,खासदारांचा मुलगा मुलगी आमदार,आमदारांचा मुलगा,मुलगी नगरसेवक, नंतर आमदार असा बदल होत असतांना शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या मुलामुलींनी त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी अधिकारी म्हणून पुढे आले पाहिजे.तरच हा कृषिप्रधान देश बनविता येईल. आज अदानी अंबानी च्या चौकीदाराने देशातील कामगार,कर्मचारी अधिकारी कायमस्वरूपी कंत्राटी करून टाकला,त्याचं मार्गावर शेतकरी जाण्याची शक्यता असतांना पंजाब हरियाणा राज्याचा शेतकरी संपूर्ण शक्तीनिशी संघटित पणे संघर्ष करीत आहे.

    त्याला समोरासमोर बसून उत्तर देण्याची वैचारिक बुद्धी मोदी चौकीदारात किंवा त्यांच्या तडीपार टोळीत नाही म्हणूनच ते पोलिसांना सुरक्षा रक्षकांना पुढे करून पाण्याचा फवारा, अश्रुगॅस,लाटी चार्ज करून घेऊ शकतात.यात शेतकऱ्यांना शेतमजुरांना त्यांचाच मुलगा भाऊ पोलीस सुरक्षा रक्षक म्हणून मारणार आहे हे त्यांनी करू नये.देशहितासाठी साविधानहीतासाठी त्याने संवेदनशील बनावे आणि संवेदना दाखवावी.आम्ही शेतकऱ्यांची शेतमजूरांची मुले आहोत हे विसरू नये.

    ✒️लेखक:-सागर रामभाऊ तायडे(मो:-९९२०४०३८५९)भांडुप मुंबई