गंगाखेड मध्ये प्रथमच गरबा व दांडिया महोत्सव संपन्न

193

*प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)*

गंगाखेड येथील वकील वाडीचा राजा गणेश मंडळ आयोजित गंगाखेड शहरांमध्ये प्रथमच गरबा व दांडिया महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. या महोत्सवामध्ये 300 पेक्षा जास्त महिलांनी व लहान मुलींनी सहभाग नोंदवला या स्पर्धेत प्रथम विजेती स्नेहा ओझा यांना गोविंदराज ज्वेलर्स यांच्याकडून सोन्याची नथ देण्यात आली द्वितीय विजेती पूजा सोमानी यांना जगदीश तोतला यांच्या काढून गिफ्ट देण्यात आले.
तसेच विविध वेशभूषा, आकर्षक जोडी, उत्साहवर्धक दांडिया खेळाडू असे अनेक पुरस्कार देण्यात आले.
बेस्ट कपल ला प्रणिता कोटलवार यांनी,बेस्ट ग्रुप साठी प्रतिभा मुंढे यांनी, सर्वोत्तम ड्रेस साठी विनिता मोहोळकर यांनी , बेस्ट मेकअप साठी मधुरा ब्युटी पार्लर यांनी पारितोषिके दिली.
या गरबा व दांडिया महोत्सवासाठी पंच म्हणून गोपी मुंडे व प्रकाश घन लाभले होते.
गंगाखेड शहरात संपन्न झालेल्या प्रथमच गरबा व दांडिया महोत्सवासाठी गंगाखेड शहरातील माउंट लिटेरा जी स्कूल तसेच गोविंदराज ज्वेलर्स तसेच रेवणवार फॅमिली शॉपी सि पब कॅफे इंटर्न हब कंपनी यांनी विशेष सहकार्य केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक कुणाल जाधव उत्तरा चौधरी दीपचंद्र चौधरी श्रेया बंडावर मयुरी शेटे प्रणिता वहिनी आकाश करंडे गौरव ओझा दत्ता कदम भारत डांगे विठ्ठल नुरे समर्थ सावरे आदित्य जाधव समीर हटेकर यांनी परिश्रम घेतले