गॅस सिलेंडर कनेक्शनसाठी महिलांचे माजी जि.प.अध्यक्ष अजय कंकडालवार यांना निवेदन

68

 

अहेरी : तालुक्यातील अनेक महिलांना अद्याप गॅस सिलेंडर कनेक्शन मिळालेले नसल्याने मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. घरगुती कामकाजात वेळेचा व ऊर्जेचा अपव्यय होत असल्याने महिला त्रस्त आहेत.या पार्श्वभूमीवर गॅस सिलेंडर कनेक्शन तात्काळ मिळावे यासाठी संबंधित लाभार्थी महिलांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष तथा विद्यमान संचालक मा.श्री.अजयभाऊ कंकडालवार यांना निवेदन दिले.

पवन गॅस एजन्सी, एटापल्ली यांच्याकडे चार वर्षा अगोदर अर्ज करूनही मोफत गॅस कनेक्शन उपलब्ध झालेले नाही.असे महिलांनी स्पष्ट केले.सर्व कागदपत्रे पूर्ण असूनही संबंधित लाभार्थींना अद्याप गॅस मिळाला नसल्यामुळे महिलांच्या दैनंदिन जीवनात अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत.

निवेदन देणाऱ्या लाभार्थी महिलांमध्ये रेखा रामटेके, पायल लखी डोंगरे,रमा सुरेश राठे,कविता संगीता चव्हाण,मीनल साहेबराव नागमोते,संगीता बापू गोसावी,सविता अशोक गजभिये,निलिमा मनोज मडावी, भारती ईश्वर मडावी,संगीता संजय चव्हाण, साधना उत्तम श्रावण,सविता ओमकार,मडावी,लिला पेमसिंग चव्हाण यांचा समावेश आहे.

महिलांनी गॅस सिलेंडर कनेक्शनसंदर्भात तात्काळ सकारात्मक कारवाई व्हावी,अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.