महात्मा फुले हायस्कूल ला क्रीडा अधिकारी यांची सदिच्छा भेट !…. क्रीडा शिक्षक एच डी माळी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन अभिष्टचिंतन !……

147

 

धरणगाव प्रतिनिधी – पी डी पाटील

धरणगांव – शहरातील सुवर्ण महोत्सवी शाळा महात्मा फुले हायस्कूल येथे क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांनी सदिच्छा भेट दिली. सर्वप्रथम शाळेचे मुख्याध्यापक जे एस पवार यांनी क्रीडा अधिकारी जगदीश चौधरी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.
क्रीडा अधिकारी यांनी शाळेतील क्रीडा विभागाशी व क्रीडा विभाग प्रमुख एच डी माळी, एस एन कोळी यांच्याशी विस्तृत चर्चा केली. शाळेतील क्रीडा शिक्षक एच डी माळी यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्याचे निमित्ताने क्रीडा अधिकारी चौधरी यांनी शाल – पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार केला. याप्रसंगी धरणगांव तालुका क्रीडा समन्वयक एस एल सूर्यवंशी, क्रीडा शिक्षक जितेंद्र ओस्तवाल, डी एन पाटील तसेच शाळेतील शिक्षक बंधू – भगिनी उपस्थित होते.