ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर येथे दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वीपणे संपन्न

46

चिमूर (प्रतिनिधी): सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण मंडळ, गडचिरोली द्वारा संचालित ग्रामगीता महाविद्यालय, चिमूर आणि सिदवी फाउंडेशन, विशाखापट्टणम आंध्रप्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेली दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषद दिनांक २९ व ३० सप्टेंबर २०२५ रोजी यशस्वीपणे पार पडली. या परिषदेचा विषय “रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र, गणित व संगणकशास्त्रातील पर्यावरणपूरक नवसंकल्पना”होता.
या परिषदेच्या उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनंदा एस. आस्वले यांनी तर परिषदेचे उद्घाटन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांच्या हस्ते पार पडले व त्यांनी परिषदेला मौलिक मार्गदर्शन केले. याप्रसंगी उपस्थितांच्या हस्ते परिषदेच्या प्रोसेडिंगचे अनावरण करण्यात आले. यानंतर सेमाना विद्या व वनविकास प्रशिक्षण संस्थेच्या संचालिका कु. रोशनीताई वडेट्टीवार यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन केले.
या आंतरराष्ट्रीय परिषदेला प्रो. ए. श्रीनिवास राव ,सिनिअर सायंटिस्ट, एवायआर स्टुडिओ, बेथेस्डा, युएसए, डॉ. डिक्सन अॅडॉम ,क्वामे एनक्रुमा युनिव्हर्सिटी, घाना, रॅनिया लॅम्पौ शिक्षण मंत्रालय ग्रीस, डॉ. नागाबाबू अब्बाराजू सिदवी फाउंडेशन, हैदराबाद , डॉ. प्रसाद खानझोडे प्राचार्य, लोकमान्य टिळक महाविद्यालय, वणी या मान्यवरांनी उपस्थित राहून परिषदेच्या निमित्ताने आपले मत व्यक्त केले. तसेच डॉ. नामदेवराव बेलसरे माजी प्राचार्य, ब्रिजलाल बियानी महाविद्यालय, अमरावती यांनी आपल्या बीजभाषणातून आइन्स्टाईनच्या विशेष संदर्भात वैज्ञानिक विचार आणि मानवी विकासाच्या प्रवासातील महत्त्वाचे टप्पे या विषयावर सखोल मार्गदर्शन केले.
ही आंतरराष्ट्रीय परिषद प्रत्यक्ष व आभासी दोन्ही स्वरुपात घेण्यात येऊन एकूण चार तांत्रिक सत्र घेण्यात आलेत, या तांत्रिक सत्रासाठी व्याख्याते म्हणून डॉ. प्रशांत बोरकर जे.बी. सायन्स कॉलेज वर्धा, डॉ. विजय पावडे एलआयटी नागपूर, डॉ. गणेश केदार, गणित विभागप्रमुख,नागपूर विद्यापीठ उपस्थित राहून त्यांच्या संशोधन कार्यावर मार्गदर्शन केलेत. या परिषदेच्या तांत्रिक सत्रासाठी अध्यक्ष म्हणून डॉ. प्रशांत ठाकरे, डॉ. कृष्णा कारू, डॉ. अतुल येरपुडे, डॉ. राम नरेश शिषोदिया आणि सहअध्यक्ष म्हणून डॉ. अतुल नागपुरे, डॉ. असलम सूर्या, डॉ. अमोल नांदे, प्रा. अंकोश रामटेके उपस्थित राहून जबाबदारी उत्तमपणे पार पाडली.
या परिषदेमध्ये देशविदेशातून अनेक संशोधकांनी आपल्या संशोधनाचे सादरीकरण केले.या परिषदेमुळे देश-विदेशातील संशोधकांना एकत्र येण्याची संधी मिळाली. त्यांनी आपले मौलिक संशोधन सादर करतांना पर्यावरणपूरक शास्त्रीय नवकल्पनांवर विचारमंथन केले. विद्यार्थी, युवा संशोधक आणि प्राध्यापक यांच्यात शैक्षणिक व बौद्धिक देवाणघेवाण घडून आली. परिषदेतून निर्माण झालेल्या नव्या संकल्पना आणि सहकार्याच्या दिशा भविष्यातील संशोधनासाठी निश्चितच उपयुक्त ठरणार आहेत. परिषदेच्या समारोपीय समारंभाला प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली, डॉ. लेमदेव लडके प्राचार्य, एन. एस. महाविद्यालय भद्रावती यांची आभासी उपस्थिती होती. ही आंतरराष्ट्रीय परिषद यशस्वी करण्यासाठी समन्वयक डॉ. हुमेश्वर आनंदे, सहसमन्वयक प्रा. नागेश ढोरे, प्रा. समिरकुमार भेलावे, डॉ. वरदा खटी, डॉ. प्रणाली टेंभूर्णे, प्रा. प्रज्ञा खोब्रागडे, प्रा. स्नेहलकुमार कापसे तसेच महाविद्यालयाचे आयक्यूएसी समन्वयक डॉ. निलेश ठवकर व महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतलेत.