इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील विद्यार्थ्यांची सॉफ्ट टेनिस स्पर्धेत विभागीय स्तरावर निवड

109

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा (१ ऑक्टोबर)- इन्फंट जीजस सोसायटी राजूरा द्वारा संचालित इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल राजुरा येथील वयोगट १४ व १७ वर्ष मधून जिल्हास्तरीय शालेय सॉफ्ट टेनिस स्पर्धा दिनांक २९ सप्टेंबर ला जिल्हा स्टेडियम चंद्रपूर येथे आयोजित करण्यात आली होती.
या स्पर्धेत इन्फंट जीजस इंग्लिश हायस्कूल , राजुरा येथील वयोगट १७ आणि १४ वर्षातील विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला आहे. या विद्यार्थ्यांची विभागीय स्तरासाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांच्या यशाबाबत संस्थापक तथा माजी आमदार सुभाष धोटे, संस्थेचे सचिव अरुण धोटे , संस्थेचे अध्यक्ष अभिजीत धोटे तसेच सीबीएसइ शाळेच्या मुख्याध्यापिका मंजुषा अलोने, स्टेट शाळेच्या मुख्याध्यापिका सिमरनकौर भंगू ,मुख्याध्यापक रफिक अन्सारी तसेच क्रीडा शिक्षक पुंडलिक वाघमारे, हर्षल क्षीरसागर, श्रुती यादव,सहायक शिक्षक सुभाष पिंपळकर व शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले तसेच पुढील वाटचालीसाठी मनः पूर्वक शुभेच्छा दिल्या.