चोपडा महाविद्यालयात Career Readiness:- Skills, Strategies and Success” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन

33

 

चोपडा :येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ. सुरेश जी. पाटील महाविद्यालयात रसायनशास्त्र विभागातर्फे दि.२९ सप्टेबर २०२५ रोजी तृतीय वर्ष व एम.एस्सी रसायनशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांसाठी. माजी विद्यार्थी विशाल पाटील यांचे ‘Career Readiness:- Skills, Strategies and Success” या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
रसायशास्त्र विभागातील माजी विद्यार्थी विशाल पाटील हे भोईसर ता. पालघर येथील Microtech Polychem Pvt. Ltd. ह्या नामांकित multinational कंपनीत H.R. manager म्हणून कार्यरत आहेत.
या कार्यशाळेकरिता अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे उपस्थित होते. यावेळी रसायनशास्र विभाग प्रमुख डॉ. एस. आर. पाटील यांनी प्रास्ताविक केले तसेच वक्त्यांचा परिचय प्रा. डॉ. पी. के. लभाने यांनी करून दिला.
या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री विशाल पाटील यांनी ममार्गदर्शन करतांना T.Y.B.Sc. Chemistry आणि M.Sc. organic chemistry उत्तीर्ण झाल्यावर कोणत्या ठिकाणी रसायनशास्र विषयाच्या विद्यार्थ्यांना नोकरी उपलब्ध असतात? व फार्मा कंपनीचे विविध विभाग, त्याकरिता असलेली पात्रता, त्यासोबत आवश्यक असलेले मुलाखतीबाबतचे कौशल्य (soft skill), विचारले जाणारे प्रश्न त्यावर अपेक्षित असलेले उत्तर, मुलाखतीला जाताना आवश्यक असलेला पोशाख, आवश्यक मूळ कागदपत्र, CV तयार करतांना घ्यायची काळजी याबाबत विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य प्रा. डॉ. के. एन. सोनवणे यांनी विभागातील यशस्वी माजी विद्यार्थ्यांविषयी गौरोद्गार काढले. सर्वसाधारण परिस्थितीतून Multinational Pharma company मध्ये manager पदावर सर्वसाधारण विद्यार्थी जाऊ शकतो, असे प्रतिपादन आपल्या भाषणात केले.यावेळी माजी विद्यार्थी विशाल पाटील याचेही अभिनंदन केले व आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी अशा प्रकारच्या कार्यशाळेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. बी. एम सपकाळ यांनी केले व आभार प्रदर्शन मयूर पाटील यांनी मानले. या मार्गदर्शन कार्यशाळेकरिता T.Y.B.Sc Chemistry आणि M.Sc. organic chemistry विषयांचे एकूण १०० विद्यार्थी उपस्थित होते.