

*सचिन सरतापे (प्रतिनिधी म्हसवड )मोबा. 9075686100*
म्हसवड (सातारा ) : राज्य मार्ग परिवहन (एसटी)
महामंडळाने दिवाळी हंगामासाठी तिकीट दरामध्ये १० टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे यामुळे प्रवासी वर्गात प्रचंड नाराजी पसरली असून या भाडेवाढीचा निर्णय त्वरित मागे घ्यावा अशी मागणी प्रवाश्याच्याकडून होत आहे.
१५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर अशी २० दिवसांसाठी हंगामी भाडेवाढ लागू राहणार आहे. यामुळे एसटीच्या तिजोरीत सुमारे १ हजार ते १,१०० कोटीचा महसूल जमा होईल. भाडेवाढीमुळे लांब पल्ल्याचा प्रवास ९० ते १०० रुपयांनी महाग होईल.
परंतु सध्या संपूर्ण महाराष्ट्र भर पावसाने आणि महापुराने थैमान घातले आहे यां पावसामुळे शेतकरी, व्यापारी आणि सामान्य नागरिकांचे प्रचंड हाल आणि आर्थिक नुकसान झाले असून महाराष्ट्रातील जनता मेटा कुटीला आली आहे रोजची दैनंदिनी कशी चालवायची हा मोठा प्रश्न जनतेपुढे आहे शेतकरी कर्जबाजारी झाला आहे उत्पन्नाचे स्तोत्र बंद आहेत काहीच पर्याय जनतेपुढे उपलब्ध नाहीत अशातच दसरा, दिवाळी सण कसा साजरा करायचा हा यक्ष प्रश्न जनतेपुढे असताना ही एस टी ची हंगामी भाडेवाढ कशासाठी असा सवाल आता प्रवाशी वर्गातून विचारला जातं आहे यां हंगामी भाडेवाढीमुळे प्रवाश्यामध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे ही भाडेवाढ त्वरित मागे घ्यावी अशी प्रवाश्यासहित सामान्य नागरिकांची मागणी आहे
*दिवाळी हा सण हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. हिंदू चंद्रमास आश्विन आणि कार्तिक या महिन्यांत म्हणजे सप्टेंबर आणि नोव्हेंबरच्या मध्यात दिवाळी साजरी केली जाते.हा उत्सव साधारणपणे पाच ते सहा दिवस चालतो.यां कालावधीत शाळाना सुट्टया असतात अनेक लोकं हा सण साजरा करणेसाठी मोठ्या प्रमाणात आपल्या गावी येतात भाऊबीजेदिवशी बहिणी आपल्या भावाला ओवाळण्यासाठी आपल्या माहेरी जातं असतात आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पाऊस आणि महापूर येऊन जनतेचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत ही हंगामी भाडेवाढ होणे म्हणजे सामान्य नागरिकांच्या जखमेवर मीठ चोळल्या सारखेच आहे.*



