खबरदार!!! रावण दहन कराल तर—— आदिवासी संघटनेचा इशारा.

385

 

*सौ. सुवर्णा बादल बेले-(विशेष प्रतिनिधी, मो. 8208158428)*

राजुरा-रावण दहनाचा कुठलाही इतिहास नसताना, काही मनुवादी विचार सरणी च्या लोकांकडून दसऱ्याच्या दिवशी शस्त्र पूजा करण्याऐवजी ,रावण दहन करणे सुरू केले. दसरा आणि रावण दहन व विजयादशमी यांचा एकमेकांशी संबंध नसताना बहुजन समाजातील महात्मा रावण यांच्या प्रतिमेची दहन केल्या जातो. त्यामुळे आदिवासी सह बहुजन समाजाच्या भावना दुखावल्या जातात. तेव्हा विविध आदिवासी संघटना एकत्र येऊन राजुरा शहरात विजया दशमी च्या दिवशी रावण दहन करण्यास प्रखरविरोध केलेला आहे. आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन पोलिस निरीक्षक ,पोलिस स्टेशन राजुरा यांची भेट घेऊन .आपल्या महात्मा रावणा विषयी भावना व्यक्त केल्या व रावण दहन करण्यास विरोध दर्शविणारे निवेदन देण्यात आले. या प्रसंगी पोलिस निरीक्षक सुमित परतेती यांनी भवानी माता देवस्थान कमिटी यांच्याशी तत्काळ पोलिस स्टेशन मध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले. बैठकीत आदिवासी संघटनाच्या व भवानी माता देवस्थान कमिटी च्या समन्वयाने रावण दहन ऐवजी भ्रष्टाचार, दहशदवाद, आतंकवाद व वाईट प्रथांचे दहन करण्याचे ठरविण्यात आले.ह्याला दोन्ही पक्षांनी पाठिंबा दर्शवला. व रावण दहन न करण्याचा निर्णय घेतला.

*******************
आदिवासी समाजाच्या भवनाचा आदर करून यावर्षी रावण दहन करण्यात येणार नाही. त्या एवजी भ्रष्टाचार, दहशतवाद, अंतंकवाद व वाईट प्रथांचे दहन करण्याचे ठरविण्यात आले.
चव्हाण मामा
व्यवस्थापक
भवानी माता देवस्थान समिती