राष्ट्रपिता महात्मा गांधी लालबहादुर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी

44

 

प्रतिनिधी (अनिल साळवे, 8698566515)
पालम तालुक्यातील रावराजूर येथील श्री नरेंद्र गिरी माध्यमिक विद्यालयात (दिनांक २ ऑक्टोबर गुरुवार) रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली तर राष्ट्रीय स्वच्छता दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
सुरुवातीला भारत माता राष्ट्रपिता महात्मा गांधी,लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांचे पूजन सर्व उपस्थित शिक्षकांनी केले.भारतमातेची आरती करून महानविभूतींनी केलेले कार्य व स्वच्छतेचे महत्त्व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रकाश डिकळे यानी सांगितले सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी यांनी महान विभूतीस विनम्र अभिवादन केले.वंदे मातरम् ने कार्यक्रमाची सांगता झाली सर्व उपस्थित विद्यार्थी शिक्षक शिक्षेकतर कर्मचारी यांनी राष्ट्रीय स्वच्छता दिवसानिमित्त परिसर स्वच्छता व वर्गाची स्वच्छता केली.या कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षक प्रकाश डिकळे यांनी मानले