

चंद्रपूर- (जिल्हा प्रतिनिधी)- जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत कार्यरत व सेवानिवृत्त शिक्षकांचे एकस्तर थकबाकी चे देयके जिल्हा परिषद चंद्रपूर ने जिल्हा कोषागार अधिकारी कार्यालयांमध्ये सादर करण्यात आले आहे. मात्र जिल्हा कोषागार अधिकारी पवार हे वारंवार त्रुटी दाखवून प्राथमिक शिक्षकांचे एकस्तर थकबाकी चे देयके वारंवार परत करण्याचा सपाटा सुरू केलेला असून परिणामी प्राथमिक शिक्षकांची मानसिकता बिघडलेले आहे. त्यामुळे जिल्हा कोषागार अधिकारी पवार यांचेविषयी द्वेष निर्माण झालेला असल्याने प्राथमिक शिक्षकांचा आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार करण्याचा नियोजन सुरु आहे.
वारंवार त्रुटी दाखवून परत करण्याचा कुटील कारनामा जिल्हा कोषागार अधिकारी पवार हे करीत असल्याने त्यांची तक्रार आम.सुधीर मुनगंटीवार, आम. सुधाकरजी अडबाले, आम. अभिजित वंजारी त्यांचेकडे एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा नियोजन व विकास समितीच्या सभेत सर्व आमदारांनी प्राथमिक शिक्षकांचे एकस्तर थकबाकीचे देयके मंजुर करुन शिक्षकांचे खात्यात जमा करण्याचे आश्वासन जिल्हा कोषागार अधिकारी यांनी दिले असताना सुद्धा पुन्हा सर्व आमदारांच्या सुचनेला केराची टोपली व ठेंगा दाखवून सदर देयके मंजुरीसाठी ग्रामविकास मंत्रालयाचे अनुमती पत्र असल्याशिवाय काढता येत नाही. अशी ताठर भूमिका जिल्हा कोषागार अधिकारी पवार यांनी घेतल्याने जिल्हा कोषागार कार्यालयात आक्रोश मोर्चा काढण्याचा निर्धार महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती चे राज्य नेते विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर, राज्याध्यक्ष अल्का ठाकरे, चंदा खांडरे, नारायण कांबळे, दिपक व-हेकर, किशोर आनंदवार जिल्हाध्यक्ष, शालिनी देशपांडे जिल्हा अध्यक्ष महिला मंच, सुरेश गिलोरकर जिल्हा सरचिटणीस, सुनील कोहपरे, गंगाधर बोढे, पौर्णिमा मेहरकुरे, जीवन भोयर, सुभाष अडवे, रवि सोयाम, दिवाकर वाघे, विलास मोरे व जिल्हा पदाधिकारी व सर्व तालुका कार्यकारिणी पदाधिकारी यांनी केले आहे असे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख लक्ष्मण खोब्रागडे यांनी कळविले आहे.



