चोपडा महाविद्यालयात ‘स्री शक्तीचा जागर’ कार्यक्रम उत्साहात साजरा

87

 

चोपडा: येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ.सुरेश जी.पाटील महाविद्यालयातील मानसशास्त्र विभाग व मानसमित्र समुपदेशन विद्यार्थी मंडळातर्फे ‘स्री शक्तीचा जागर’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रतिमापूजन व माल्यार्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एन.सोनवणे उपस्थित होते तसेच उपप्राचार्य प्रा.डॉ.ए.एबी.सूर्यवंशी, समन्वयक डॉ.एस.ए.वाघ, रजिस्ट्रार श्री.डी.एम.पाटील, एस. बी. देवरे आदि उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना मानसशास्त्र विभाग प्रमुख व मानसमित्र समुपदेशन विद्यार्थी मंडळाचे समन्वयक डॉ.आर.आर.पाटील यांनी मानवी जीवनातील स्रीचे महत्व विविध उदाहरणातून स्पष्ट केले.तसेच विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, स्वयंप्रेरणा निर्माण व्हावी या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आला असल्याचे स्पष्ट केले.

यावेळी प्रगती चव्हाण यांनी राजमाता जिजाऊ, जान्हवी साळुंखे हिने राणी लक्ष्मीबाई, नेहा धनगर हिने अहिल्याबाई होळकर, विद्या कोळी हिने ताराबाई शिंदे, गायत्री शिरसाठ हिने सावित्रीबाई फुले, पूजा फुगारे हिने रमाबाई आंबेडकर, रेवती भिल्ल हिने आनंदीबाई जोशी, हर्ष पाटील हिने कवयित्री बहिणाबाई चौधरी, कोमल पाटील हिने मा.ना.अक्कासाहेब शरच्चंद्रिका सुरेश पाटील, दिप्ती वाणी हिने सिंधुताई सपकाळ, योगेश्वरी पाटील हिने सोफिया कुरेशी अशा वरील अनेक कर्तबगार स्रियांचा परिचय व समाजाविषयीचे योगदान, संघर्ष यांचे सादरीकरण केले.

यावेळी महाविद्यालयाचे समन्वयक डॉ.एस.ए.वाघ यांनी आपले मनोगत व्यक्त करतांना ‘कर्तृत्ववान व इतिहासातील विविध क्रांतिकारी स्रियांचा आदर्श आजच्या नवपिढीने आत्मसात करावा’ असे मत व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु.सानिया पिंजारी हिने केले तर आभार सौ.एस.बी.पाटील यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी घनश्याम माळी व विजय नागदेव यांनी परिश्रम घेतले. यावेळी महाविद्यालाय्तील बहुसंख्य विद्यार्थी, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी बंधू-भगिनी उपस्थित होते.