सुरेश मंत्री राष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित

177

अंबाजोगाई (प्रतिनिधी ) : तालुक्यातील देवळा येथील विश्वरूपी माध्यमिक विद्यालयात कार्यरत असणारे शिक्षक व स्तंभलेखक सुरेश मंत्री यांना अंबाजोगाई इनरव्हिल क्लब कडून शिक्षण व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल राष्ट्राचे शिल्पकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दि. १ ऑक्टोंबर रोजी येथील रोटरीच्या सभागृहामध्ये झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना हा पुरस्कार ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती मुमताज पठाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सुरेश मंत्री हे २४ वर्षांपासून शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते विद्यार्थी प्रिय शिक्षक म्हणून ओळखले जातात. सोबत राज्यातील अनेक विभागीय व स्थानिक वृत्तपत्रांमधून ते सामाजिक, शैक्षणिक व राजकिय विषयांवर सातत्याने लेखन करत असतात. त्यांचा विचारमंथन हा लेखसंग्रह प्रकाशित आहे. राष्ट्रीय परिसंवादामध्ये त्यांनी शोधनिबंध सुद्धा सादर केले आहेत. अनेक पुस्तकांचे त्यांनी समिक्षण सुद्धा केले आहे. यापुर्वीही त्यांना येथील रोटरी क्लब कडून पुरस्कार देवून सन्मानित केले होते. त्यांच्या या कार्याची दखल घेवून अंबाजोगाई इनरव्हिल क्लब कडून राष्ट्राचे शिल्पकार पुरस्कार देवून त्यांना सन्मानित करण्यात आले. संस्थेचे सचिव राजेंद्र लोमटे, उपाध्यक्ष सतीश लोमटे, मुख्याध्यापक एस. जी. खोसे व शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व गावक-यांनी त्यांचे याबद्दल अभिनंदन केले आहे.