

रंग, रूप, वेशभूषा सुंदर असेल तर आपले चरित्र चांगले असे मनुष्य मानतो. मात्र रूपाने चांगले असण्यापेक्षा मनाने चांगले विचार आणले पाहिजे. दया भाव ठेवला पाहिजे. दुसऱ्यांविषयी वाईट विचार मनात आणणे तशी कृती करणे म्हणजे आपण आपला पुण्यकाळ संपविण्यासारखे असते. दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये आपण स्वत: पडत असतो. यासाठी ‘नवपद’ मध्ये सांगितलेल्या श्रीपाल व गुणमाला ची गोष्ट प. पू. निलेशप्रभाजी म. सा. यांनी सांगितले. श्रीपाल हा भांड नसल्याचे प्रमाण देण्यासाठी पत्नी गुणमाला ही रत्नमंजूषा यांच्यासह वडीलांकडे जाते. वडिलांना सत्यपरिस्थीती समजावून सांगते, त्यावेळी धवलशेठने चुकिची माहिती दिल्याचे समोर येते. त्यामुळेच राजा धवलशेठला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावितो, मात्र श्रीपाल धवलशेठला क्षमा करतो.
यानंतर काही दिवसांनी धवलशेठची बुद्धी पुन्हा भ्रष्ट होते आणि श्रीपाल नरेश झोपलेले असताना त्यांना मारण्यासाठी धवलशेठ त्यांचा खोलीमध्ये जातो. ज्या पायऱ्या चढून धवलशेठ जात असतो त्यावरुन त्याचा पाय घसरुन तो पडतो आणि त्याचा मृत्यू होतो. याच धवलशेठ वर विधिवत अंत्यसंस्कार श्रीपाल नरेश करतात. नवपद मधील वीणावादक स्वयंवर, त्रिलोक सुंदरीचा विवाह आदी प्रसंगाबाबत प. पू. निलेश प्रभाजी म. सा. यांनी श्रावक-श्राविकांना सांगितले.(स्वाध्याय भवन, जळगाव,
दि. ०५ ऑक्टोबर २०२५)
✒️शब्दांकन:-देवेंद्र पाटील(मो.9673934618)



