राजुरा शहराला वृक्षतोडीचे ग्रहण-मोठ मोठे वृक्ष विना परवानगीने खुलेआम तोडले जाताय

164

✒️सौ.सुवर्णा बादल बेले(विशेष प्रतिनिधी)मो:-8208158428

🔺नगर परिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष

🔺नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था वनमंत्र्यांकडे करणार तक्रार.)

राजुरा(दि.4ऑक्टोबर):- राजुरा नगर परिषद हद्दीत सध्या मोठ्याप्रमाणात मोठमोठे वृक्ष विनापरवानगी तोडण्याचा सपाटा सुरू असून नगर परिषद प्रशासनाचे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याने पर्यावरणप्रेमिनी तीव्र नाराजीचा व्यक्त केली आहे. तसेच या सर्व घटनांच्या विरोधात नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था लवकरच पर्यावरणमंत्री व वनमंत्र्यांना याबाबत निवेदन देऊन तक्रार करणार आहे. राजुरा शहरातील जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय राजुरा येथील कडुनिंबाचे अतिशय मोठे झाडं मागील महिन्यात तोडण्यात आले.

तसेच चुनाभट्टी वार्डातील सोनिया गांधी पब्लिक स्कूल च्या बाजूला असलेले मोठे वृक्ष तोडण्यात आले. तसेच आदर्श शाळेकडील एका खाजगी ले आऊट वर तर वृक्ष तोडीचा सपाटाच लावला आहे. विशेष म्हणजे या कोणत्याही वृक्षांना तोडण्यासाठी नगर परिषद वृक्ष प्राधिकरण समितीची परवानगी घेतली नाही. एकीकडे शासन “एक पेड माँ के नाम ” , वृक्षलागवडीच्या योजना राबवित असताना राजुरा शहरात मोठ्या प्रमाणात विनापरवानगी वृक्षतोड सुरू आहे. शहरातील नागरिकांकडून मोठ्याप्रमाणात वृक्ष कर वसूल करीत असताना प्राचीन वारसा वृक्ष करण्यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सातत्याने नगर परिषदेला लेखी निवेदने देत आहेत. परंतू त्याच्याकडेही दुर्लक्ष होत आहे.

महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन अधिनियम १९७५, महसूल व वन विभाग शासन निर्णय दिनांक ४ जून २०१९, महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे संरक्षण व जतन (सुधारणा) अधिनियम २०२१ अन्वये नगर परिषद राजुरा येथे वृक्ष प्राधिकरण समिती गठित करण्यात आली आहे. परंतु जिल्हा परिषद शाळेतील शासकीय जागेतील मोठमोठे वृक्ष तोडताना येथील जिल्हा परिषद प्रशासन गप्प कसे?, शहरातील विना परवानगीने खुलेआम वृक्षतोड होत असताना नगर परिषद प्रशासन गप्प कसे? असे सवाल पर्यावरण प्रेमी विचारात आहे. या सर्व प्रकरणात आता नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था राज्याच्या पर्यावरण व वनमंत्र्यांकडे निवेदन देऊन तक्रार करणार आहे. 

वाढत्या कर वाढीत वृक्ष कर मोठ्याप्रमाणात वाढले असताना मोठमोठे वृक्ष सर्हासपने तोडले जात आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांमधे तीव्र नाराजी बघायला मिळते. या संदर्भात नगर परिषद प्रशासनाने संबंधितांवर तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेने केली आहे.