चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा डोक्यात घन घालून खून ; पतीची गळफास घेऊन आत्महत्या

2332

✒️सचिन सरतापे(म्हसवड प्रतिनिधी)

 म्हसवड(दि.8ऑक्टोबर):-हिंगणी, ता. माण जि. सातारा येथे चारित्र्याच्या संशया वरून पतिने पत्नीच्या डोक्यात दगड फोडायचा घन घालून खून केला व त्यानंतर स्वतः विषारी औषध प्राशन करून ट्रॅक्टर च्या रबरी बेल्टने गळा आवळून स्वतःला फास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली यांची फिर्याद ज्ञानेश्वर वस्ताद झिमल यांनी म्हसवड पोलीस स्टेशनला दिली.

पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहिती नुसार फिर्यादीने 

 07/10/2025 रोजी रात्रौ 10:00 वा. ते दिनांक 08/10/2025 रोजी सकाळी 06:00 वाचे दरम्यान मौजे हिंगणी जि.सातारा गावचे हद्दीत आसळओढा येथे मयत आनिता बंडु घुटुकडे हीचे राहते घराचे बाजुला असलेल्या पत्र्याचे शेडमध्य़े माझे दाजी बंडु अंकुश घुटुकडे रा.हिंगणी ता.माण जि.सातारा याने माझी बहिण आनिता बंडु घुटुकडे हिचे चारित्र्यावर संशय घेवुन तीचे डोक्यात लाकडी दांडा असलेल्या लोखंडी घनाने मारुन गंभीर जखमी करुन तीचा खुन करुन स्वत: विषारी औषध पिवुन रबरी बेल्टने पत्र्याचे शेडचे अँगलला गळफास घेवुन आत्महत्या केली आहे म्हणुन माझी बंडु अंकुश घुटुकडे रा.हिंगणी ता.माण जि.सातारा याचे विरुध्द तक्रार दिली आहे.या घटनेमुळे हिंगणी गाव हादरले असून या खुणाचीच चर्चा गावामध्ये पाहवयास मिळत आहे.

रणजित सावंत उपविभागीय पोलीस अधिकारी दहिवडी विभाग कॅम्प वडूज यांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली व गुन्ह्याच्या तपासासाठी योग्य त्या सूचना केल्या आहेत.

या घटनेचा तपास सपोनि. अक्षय सोनवणे आणि त्यांची टीम करत असून श्वान पथक आणि ठसे तज्ञ व फॉरेन्सिक टीमला पाचारण करणेत आले आहे.