✒️संजय कोळी(विशेष प्रतिनिधी)मो:-9075716526
धुळे(दि.31डिसेंबर):- दिल्ली येथे कविता ताई कोळी यांना अटल स्मुती सन्मान २०२० ने रविवारी दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले.
भारतीय बौद्ध संघाद्वारे आयोजित माजी पंतप्रधान भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनी निमित्त एनडीएमसी सभागृह दिल्ली येथे रविवारी महिला कल्याण आणि सशक्तीकरण संमेलन तसेच अटल स्मृती सन्मान समारंभ २०२० चे आयोजन करण्यात आले. संमेलनाचे उद्घाटन राज्यसभा खासदार व भाजप राष्ट्रीय सरचिटणीस दृष्यंतकुमार गौतम यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी राज्यमंत्री किशन रेड्डी कृषी राज्यमंत्री पुरुषोत्तम रूपाला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय बौद्ध संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष भंते संग प्रिय राहुल होते. संमेलनात देशभरात महिलांच्या क्षेत्रात कार्यरत डॉक्टर, समाजसेविका व शिक्षिका अशा एकूण ६१ महिलांना अटल स्मृती सन्मान प्रदान करून गौरविण्यात आले.
यात महाराष्ट्रातील धुळे जिल्ह्यातील सौ कविता ताई कोळी,शिक्षिका,आदिवासी वाल्मिकलव्य सेना प्रदेश अध्यक्षा व पैलवान गृप कुस्ती प्रेमी महाराष्ट्र राज्य महिला संपर्क प्रमुख यांच्या शैक्षणिक, सामाजिक, सास्कृतिक, कला, क्रीडा क्षेत्रातील कामाची दखल घेऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सन्मान सोहळ्यात खा. विनोद सोनकर, दिल्ली विधान सभेचे विरोधी पक्षनेते रामवीर सिंह बिघुडि, उत्तर प्रदेशचे ऊस विकास मंत्री सुरेश पासी, माजी केंद्रीय मंत्री अशोक प्रधान, खा.मिनाक्षी लेखी, राज्यसभा खासदार डॉ. सत्यनारायण जटिया, खासदार सुधीर कुमार गुप्ता, माजी कृषी राज्यमंत्री कृष्णा राज, भारतीय बौद्ध संघ महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष डॉ. मिलिंद नाखले आदी मान्यवर उपस्थित होते. महिला सक्षमीकरणा सोबतच समाजसेवेसाठी समर्पित करण्यात आला.
समाजसेविका व शिक्षिका कविता ताई कोळी सक्षमीकरणा सोबतच समाजसेवेसाठी ही समर्पित आहेत. महिलांच्या विविध समस्यांना वाचा फोडण्यास होण्यातच समाजातील दुर्लक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी अनेकदा लढा उभारला आहे. समाजातील महिलांना धीरोदात्तपणे जगावे यासाठी त्यांचा प्रयत्न असतो. स्वतःची समाज सेवेसाठी सदैव तत्पर असतात असे मान्यवरांनी याप्रसंगी सांगितले. शिक्षिका कविता ताई कोळी यांना अटल स्मृती सन्मान २०२० ने सन्मानित करण्यात आले.