?एम. ए. आंबेडकर विचारधारा या अभ्यासक्रमातून गोंडवाना विद्यापीठातून प्रथम मेरिट
✒️रोशन मदनकर(उप संपादक)मो:-8888628986
ब्रम्हपुरी(दि.13जानेवारी)::- नुकताच गोंडवाना विद्यापीठाचे गुणवत्ता प्राप्त विद्यार्थ्यांची यादी जाहीर केली असून स्थानिक डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्रशांत डांगे हे एम. ए. आंबेडकर विचारधारा या अभ्यासक्रमातून गोंडवाना विद्यापीठातून प्रथम मेरिट आले.त्यां
नी आपल्या यशाचे श्रेय आंबेडकर विचारधारा विभागप्रमुख व संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे ,महाविद्यालयाचे प्राचार्य अझिझुल हक, डॉ. स्निग्धा कांबळे, प्रा.तुफान अवतडे, प्रा.सरोज शिंगाडे यांना दिले.त्यांच्या यशाबद्दल संस्थेचे सचिव डॉ.देवेश कांबळे प्राचार्य डॉ. अझिझुल हक, डॉ.स्निग्धा कांबळे, प्रा.तुफान अवताडे, डॉ.जगदीश मेश्राम, डॉ.रुपेश मेश्राम डॉ.राजेश कांबळे, प्रा.भीमा डांगे, प्रा.फुलझेले ,प्रा.नंदेश्वर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.