देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धा

    44
    Advertisements

    ?रांगोळचा फोटो मोबाईलवर पाठवून जिंका बक्षिसे

    ✒️पूणे(पुरोगामी संदेश नेटवर्क)

    पुणे(दि.21जानेवारी):- देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य व रयत शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 26 जानेवारी निमित्त भव्य ऑनलाइन रांगोळी स्पर्धां चे आयोजन केले असून जास्तीजास्त रांगोळी स्पर्धकांनी सहभाग घ्यावा. सदर स्पर्धा देवांश फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या अध्यक्षा पुजा उदगट्टे* यांच्या अध्यक्षतेखाली व *रयत शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. अॅड. रविप्रकाश उर्फ बापूसाहेब देशमुख* व *रयत शेतकरी संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस सुनील भाऊ ठोसर* यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होत आहे. सदर स्पर्धेचे नियोजन *रयत शेतकरी संघटना सांगली जिल्हा अध्यक्ष रेखाताई माळी* यांच्या नेतृत्वाखाली होत आहे. सदर *रांगोळी स्पर्धा* ही *संपूर्ण महाराष्ट्र साठी खुली* आहे. 

    प्रथम पारितोषिक 3D 3 बर्नर ग्लास टॉप शेगडी* व *प्रमाणपत्र* , *द्वितीय पारितोषिक इंडक्शन + 5 भांडी* व *प्रमाणपत्र* , *तृतीय पारितोषिक मिक्सर* व *प्रमाणपत्र* व *सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र* देऊन सन्मानित करण्यात येईल. सर्व सहभागी स्पर्धकांना आपापली बक्षिसे आपण दिलेल्या पत्त्यावर ती घरपोच दिली जातील. अन्यथा आपणास शक्य असल्यास *रयत शेतकरी संघटना जिल्हा कार्यालय* येथून ती घेऊन जावित. स्पर्धेसाठी *51 रुपये प्रवेश फी* असेल. स्पर्धेचा कालावधी *दिनांक 21 जानेवारी 2021 ते 26 जानेवारी 2021 सायंकाळी सहा वाजेपर्यंत* राहिल. या कालावधीमध्ये सर्व स्पर्धकांनी आपण काढलेल्या रांगोळीचा फोटो व आपले संपूर्ण नाव पत्ता व मोबाईल नंबर *7248922931* या नंबर वरती पाठवावा. स्पर्धेचा निकाल दिनांक 27 जानेवारी 2021 रोजी दुपारी 12 नंतर जाहीर केला जाईल. स्पर्धेचा निकाल हा अंतिम राहील. 26 जानेवारी 2021 सायंकाळी सहानंतर येणाऱ्या स्पर्धकाला स्पर्धेमध्ये सहभाग घेता येणार नाही.

    *एक हात मदतीचा* या उद्देशाने स्पर्धेसाठी जमा होणारी फी एकत्र करून जमा झालेली रक्कम स्थानिक *मतिमंद शाळेस मदत* स्वरूपात देण्यात येईल. रांगोळी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खालील दिलेल्या या नंबर वरती *संपर्क* करून आपण आपले नाव घेऊ शकता *पूजा उदगट्टे :- 7248922931 सुनील भाऊ ठोसर :- 9405799999 रेखाताई माळी :- 9260532787 नयना ताई गवळी :- 8379001263 गणेश ढाकणे :- 8888435869 पोपट नरळे :- 9834049792 सागर जगताप :- 7020770054*