

✒️रोशन मदनकर(उप संपादक)
चंद्रपूर(दि.24मे):- ब्राईट किड्स क्रिएटिव्ह एकाडेमी च्या वतीने महाकाली नगरी देवाडा येथे माणिक कुटी भवनात लहान मुलांसाठी समर कॅम्प चे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे . या समर कॅम्प मध्ये इंडियन डेंटल असोसिएशन चे दंत चिकित्सक डॉ. भार्गव बांडे यांनी शिबिरातील विद्यार्थ्यांची दंत तपासणी करून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर , शिबिराच्या मुख्य संयोजक सौ. रजनी बोढेकर उपस्थित होत्या. या कॅम्प मध्ये कराटे चे प्रशिक्षण ब्लॅक बेल्ट विनर कु. प्रगती जेनेकर यांनी दिले तर विविध नृत्याचे धडे कु. रिया पिपरीकर यांनी दिले. बौध्दीक खेळ प्रा. नामदेव मोरे यांनी शिकवले तर मेडीटेशन व क्राफ्ट संबंधित माहिती मुकूंद दिंडोकर आणि सौ. रजनी बोढेकर यांनी दिली.
दंत चिकित्सक डॉ भार्गव बांडे म्हणाले की, दातांची योग्य काळजी घेतल्यास किडणे, दुखणे आणि इतर समस्या टाळता येतात.
स्वच्छ दात हे चांगल्या आरोग्याचे लक्षण आहे. लहानपणापासून दात स्वच्छ ठेवण्याची सवय लावल्यास दात मजबूत आणि निरोगी राहतात, असे म्हणाले.
या समर कॅम्प मध्ये महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जिल्हा कार्याध्यक्ष पी. एम. जाधव (उर्जानगर) यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन या विषयावर मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे तर्क, निरीक्षण, प्रयोग, पुरावे आणि सत्य पडताळणीच्या आधाराने पाहण्याची विचारपद्धती होय.
तर्कशुद्ध विचार करणे म्हणजे
निरीक्षण आणि प्रयोग करणे होय.
प्रयोग आणि प्रत्यक्ष कृतीतून
विज्ञानातील छोटे प्रयोग, निरीक्षणे, प्रात्यक्षिके यामुळे विद्यार्थ्यांमध्ये जिज्ञासा वाढते म्हणून विद्यार्थ्यांनी निरीक्षणाची सवय लावावी
निसर्ग, समाज, दैनंदिन घटना यांचे बारकाईने निरीक्षण करावे.
वाचन आणि माहिती शोधण्याची सवय लावावी.विज्ञानविषयक पुस्तके, मासिके, माहितीपट यांचा उपयोग करून ज्ञान वाढवावे. विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित झाल्यास जिज्ञासू, तर्कशुद्ध, विवेकी आणि जबाबदार नागरिक बनतील , असे ते म्हणाले.







